खिशात पैसा असेल तर कोणत्याही वयात काहीही करता येतं, असं म्हटलं जातं. याचेच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. ते म्हणजे एका ६५ वर्षीय करोडपती व्यक्तीने १६ वर्षांच्या शाळकरी मुलीशी लग्न केले आहे. या लग्नाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी खूप टीका करायला सुरुवात केली आहे. शिवाय लग्न केलेली व्यक्ती हे ब्राझीलमध्ये एका शहरातील महापौर आहे. हिसाम हुसैन देहैनी असं या ६५ वर्षीय व्यक्तीचं नाव असून लोकांच्या विरोधामुळे त्याला आपले पद सोडावे लागले आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने १५ एप्रिल रोजी ज्या मुलीशी लग्न केले ती सध्या शाळेत जात असून लग्नाच्या चार दिवस आधी ती १६ वर्षांची झाली आहे.

याहू न्यूजच्या रिपोर्टनुसार, देहैनी हा १४ दशलक्ष ब्राझिलियन रियाल संपत्तीचा मालक असल्याचा दावा केला जात आहे. त्याच्या लग्नाच्या वेळी तो पराना राज्यातील अराकुरियाचा महापौर म्हणून दुसऱ्या टर्ममध्ये कार्यरत होता. कौएनेशी लग्न केल्यानंतर त्याला आपल्या सिददानिया राजकीय पक्षाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तर त्याने देहैनी याने लग्नाआधी आपल्या वधूच्या दोन नातेवाईकांना नोकरीला लावलं होतं, यामध्ये मुलीची आई आणि मावशीचाही समावेश आहे.

हेही पाहा- रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीने काढलेलं स्केच पाहून ड्रायव्हर भारावला; हृदयस्पर्शी Video पाहून नेटकरी म्हणाले…

६ लग्न आणि १० मुलांचा बाप –

मेलऑनलाइनच्या रिपोर्टनुसार, लग्न केलेल्या मुलीच्या ३६ वर्षीय आईला तिच्या मावशीला देहैनी याने मोठ्या पदावर नोकरी दिली.मात्र, त्याने ही नोकरी आपल्या महापौर पदाच गैरवापर करून दिल्याचे निदर्शनास येताच त्या दोघींनाही नोकरीवरुन काढण्यात आलं आहे. देहैनी याचे सहा वेळा लग्न झाले असून त्याचे पहिले लग्न १९८० मध्ये झाले होते. तो १६ मुलांचा बाप असून त्याला २००० साली ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात अटकही झाली होती. या प्रकरणात त्याला १०० दिवसांपेक्षा जास्त तुरुंगाची हवा खायला लागली होती.

हेही पाहा- माणुसकीचे दर्शन! दिव्यांग मुलीला रस्ता ओलांडण्यासाठी महिलेने केली अशी मदत, व्हायरल Video पाहून नेटकरीही भारावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्राझीलमध्ये मुलींनी वयाच्या १६ व्या वर्षी लग्न करणे हा गुन्हा नाही. यासाठी पालकांची परवानगी घेणे आवश्यक आहे. धक्कादायक बाब म्हणजे ६५ वर्षीय देहैनीची नवीन बायको अजूनही शाळेत जाते. देहैनीशी लग्न केलेल्या मुलीने, आज आपल्या लग्नाचा दिवस हा सर्वात आनंदाचा दिवस असल्याचं म्हटलं आहे. शिवाय तिने लग्नाचे फोटो शेअर करत, कॅप्शनमध्ये, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेम. खूप खूप धन्यवाद.’ असं लिहिलं आहे.