मागील वर्षभरापासून अधिक काळ झाला अनेक शाळा आणि कॉलेजमधील लेक्चर्स हे ऑनलाइन माध्यमातून होत आहे. करोनामुळे शाळा, कॉलेजेस बंद असल्याने ऑनलाइन माध्यमातून वर्ग भरवले जात आहेत. ऑनलाइन वर्गांमधील धम्माल आणि गोंधळाची सोशल नेटवर्किंगवर कायमच चर्चा असते. तसा एका वर्षाहून अधिक कालावधी झाल्याने शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही या ऑनलाइन क्लासेसची सवय झालीय. मात्र या ऑनलाइन क्लाससोबतच देशामधील करोनासंदर्भातील बातम्या, घरचा अभ्यास अशा अनेक गोष्टींमुळे मुलांच्या मनावर परिणाम होत असल्याचंही तज्ज्ञ सांगतात. याचीच झलक सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या एका लहान मुलीच्या व्हिडीओमधून पहायला मिळत आहे.

काश्मीरमधील सहा वर्षांच्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. या व्हिडीओमधील लहान मुलगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑनलाइन माध्यमातील शिकवणीनंतर देण्यात येणाऱ्या घरच्या अभ्यासासंदर्भात तक्रार करताना दिसत आहे. “छोटे बच्चो को इतना काम क्यू रखते हो मोदी साब?”, असा प्रश्न ही मुलगी थेट देशाच्या पंतप्रधानांना विचारताना व्हिडीओत दिसते. “बडे बच्चे जो सातवी आठवी मे है उन्हा जादा होमवर्क देना चाहिऐ,” असंही ही चिमुकली या व्हिडीओत म्हणता दिसते. १० ते २ वाजेपर्यंत मला ऑनलाइन शिकवणीला बसावं लागत असल्याची तक्रारही या मुलीने केलीय. इंग्रजी, गणित, उर्दू, पर्यावरण, कंप्युटर अशा अनेक विषयाच्या लेक्चर्सला मला ऑनलाइन माध्यमातून हजेरी लावावी लागत आहे.

ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी या मुलीची तक्रार फारच गोंडस असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी पंतप्रधान कार्यालय म्हणजेच पीएमओने यासंदर्भातील उत्तर द्यावं अशी मागणी केलीय. नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहुयात.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

एकंदरितच या प्रतिक्रिया पाहता या मुलीची अडचण महत्वाची असल्याची मात्र त्याचवेळेस तक्रारीपेक्षा तिच्या गोंडसपणाचं आपल्याला अधिक कौतुक असल्याचं अनेकांनी म्हटल्याचं दिसत आहे.