देशातील किरकोळ महागाईने उच्चांक गाठला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईने सर्वसामान्य हवालदील झाला आहे. देशात कोविड महामारीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर आणखीनच महागाई वाढली. आजकाल प्रत्येक जण या महागाईचा सामना करतोय. दरम्यान आपण बरेच वेळा बोलता बोलता म्हणतो, पूर्वी एवढी महागाई नव्हती.पूर्वी ही वस्तू किती स्वस्त होती. अशाच एका सायकलचं ८८ वर्षांपूर्वीचं बिल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. ८८ वर्षापूर्वी सायकलची किंमत एकून तुम्ही थक्क व्हाल. १९३४ साली सायकलची किंमत एवढी होती की, त्या पैशांमध्ये सध्या आपला चहा नाष्टा सुध्दा होत नाही.

या फोटोमध्ये तुम्हा पाहू शकता, ते सायकलचं बिल ८८ वर्षांपूर्वीचं आहे. १९३४ साली एका व्यक्तीने सायकल खरेदी केली होती. हे बिल पाहिल्यानंतर लोकं जुन्या गोष्टींची आठवण काढतील एवढं निश्चित. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हे बिल व्हायरल झालं आहे. त्यावेळी त्या सायकलचं बिलं फक्त १८ रुपये होतं. त्यावेळचं ते बिल सध्या १८०० रुपयांच्या बरोबर आहे.

पाहा फोटो

हेही वाचा – Viral video: वर्ध्यात केक कापताना तरुणाच्या तोंडाला लागली आग, स्प्रे आणि फायर गन वापरणार असाल तर सावधान!

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते, असाच एक जुना फोटो व्हायरल झाला. आणि बरेज लोकांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.