अहमदाबादमधील एका स्ट्रीट फूड विक्रेत्याची कथा एका छोट्या व्हिडीओद्वारे इंटरनेटवर समोर आली आहे आणि यामुळे नेटीझन्स भावनिक झाले आहे. १४ वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ, जो रस्त्याच्या कडेला दही कचोरी विकतो, फूड ब्लॉगर दोयाश पथराबेने इन्स्टाग्रामवरने पोस्ट केला आहे.दोयाशने शेअर केलेल्या छोट्या क्लिपमध्ये लहान मुलगा मणिनगर रेल्वे स्थानकासमोरील त्याच्या स्टॉलवर दही कचोरी तयार करताना दिसत आहे. जेव्हा त्याने आपली कथा फूड ब्लॉगरशी शेअर केली तेव्हा मुलाच्या डोळ्यात अश्रू होते.

आर्थिक अडचणींमुळे हा मुलगा सध्या आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी दही कचोरीचा स्टॉल चालवत आहे. दोयाशने त्याच्या पोस्टच्या मथळ्यामध्ये सोशल मीडिया वापरकर्त्यांना त्याला मदत करण्याची विनंती केली.”त्याला मदत करा. तो फक्त १४ वर्षांचा आहे आणि दही कचोरी फक्त १० रुपयांना विकतो मणिनगर रेल्वे स्टेशन समोर, अहमदाबाद, गुजरात येथे. त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो. ही पोस्ट करणे आणि त्याला मदत करणे आवश्यक आहे. तो फक्त १४ वर्षांचा आहे आणि त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे, ”पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्या लहान मुलाचे कौतुक केले आणि म्हणाले, “त्याला अधिक शक्ती मिळो. हे सर्वांना शेअर करत आहे.” नंतर, दोयाश पाथराबेने शेअर केले की अनेक लोकांनी दोयाशच्या स्टॉलला भेट दिली कारण त्याच्या व्हिडीओला सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमचं काय मत आहे या व्हिडीओबद्दल?