Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कोणी मनोरंजन करून पोट धरून हसवतात तर कधी कोणी हटक्या पद्धतीने लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या शेजारी एक तरुण हातात पाटी घेऊन उभा आहे. या तरुणाने पाटीवर असे काही लिहिलेय की वाचून तुम्हीही भावूक व्हाल. (a banner holding young guy suggested to friends always be aware from people who instigate people do not like a good friendship video goes viral)

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण रस्त्याच्या शेजारी हातात पाटी घेऊन उभा आहे. त्याने ही पाटी वर धरलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याची नजर सहज या पाटीवर पडेल. येणारे जाणारे या पाटीवर लिहिलेले वाचताना दिसत आहे. काही लोक या तरुणाबरोबर फोटो काढताना दिसत आहे.

काय लिहिलेय या पाटीवर?

या पाटीवर हिन्दीमध्ये लिहिलेय, “कान भरने वाले से सावधान रहना मेरे दोस्त क्योंकी अच्छी दोस्ती लोगो से देखी नहीं जाती” म्हणजेच “कान भरणाऱ्या लोकांपासून सावध राहा कारण चांगली मैत्री लोकांना बघवत नाही” (मराठी अर्थ)

हेही वाचा : आनंद महिंद्रांनी केलं मुंबई महापालिकेचं तोंडभरून कौतूक! विजयोत्सवानंतर अशी झाली होती मरिन ड्राईव्हची अवस्था, पाहा Video Viral

पाहा व्हायरल व्हिडीओ

baba_ke_deewane_04 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रत्येकाजवळ एक चांगला मित्र असतो त्यामुळे आपल्या मित्राला शेअर करा”

हेही वाचा : शेवटी भूक महत्त्वाची! वाऱ्याच्या वेगाने आला बिबट्या अन् केला झेब्य्राच्या पिल्ल्यावर हल्ला; पुढच्या १० सेकंदांत जे काही घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सत्य वचन भाऊ” तर एका युजरने लिहिलेय, “मैत्री अशी असावी की कोणी कान भरले तरी त्याचा परिणाम होऊ नये” आणखी एका युजरने लिहिलेय, “भाऊ तु खरं बोलतोय” अनेक युजर्सना या तरुणाचे म्हणणे पटले आहे. काही युजर्सनी व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काही युजर्सनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत.