एखाद्याच्या अंगी कला असेल तर तेच त्याचं सर्वोत्तम कौशल्य असतं. कित्येकांकडे अशी कला असते जे सर्वांना थक्क करून सोडते. कला जोपसणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका मळक्या कपड्यांमधील व्यक्ती एका भिंतीवर चित्र रेखाटताना दिसत आहे. त्याने रेखाटलेलं चित्र इतकं सुंदर आहे जे तुम्हीही थक्क व्हाल.

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर mymotivational_quote नावाच्या अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते आहे की एका व्यकीने शर्ट आणि लुंगी परिधान केले आहे. त्याची कपडे मळकी आहेत. त्याने दाढीवाढवलेली आहे. तो व्यक्ती एका बसस्टॉपवर असल्याचे शेजारून जाणाऱ्या बस पाहून लक्षात येते. हा व्हिडीओ दक्षिण भारतातील असल्याचे व्हिडीओ पाहून समजते. व्हिडीओतील व्यक्ती एका भिंतीसमोर उभा आहे. तो खाली वाकून काही पाने उचलतो आणि भिंतीवर चित्र काढतो आहे. व्हिडीओच्या शेवटी त्याने काढलेले सुंदर चित्र दिसत आहे. चित्रामध्ये एक सुंदर नदी दिसत आहे. नदी किनारी नाराळाची झाडे दिसत आहे. एका झाडावर एक व्यक्ती ताडी काढण्यासाठी चढला आहे. एका छोट्य़ा पुलावरून एक बस जाताना दिसत आहे. रस्त्यावर माणसांची ये-जा सुरू असल्याचे दिसते. कोपऱ्यात एक कौलारू घरही दिसत आहे.

हेही वाचा – ही कोणती फॅशन? विचित्र जीन्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल, सुरु होताच संपली; किंमत पाहून लोक म्हणाले…”फुकट दिली तरी…”

या व्यक्तीकडे पाहून लक्षात येते की तो अत्यंत गरीब आहे आणि कदाचित रस्त्यावर राहत असावा. पण गरीब असूनही त्याच्यातील कला मात्र त्याने जोपासली आहे. त्याला चित्र काढण्यासाठी कोणत्याही कॅनव्हासची आवश्यकता नाही की रंग अथवा ब्रशची आवश्यकता नाही. त्याने फक्त भाजीपाला वापरून हे सुंदर चित्र रेखाटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – कोहलीचा रेकॉर्ड आणि बॉयफ्रेंडबरोबर प्रेमाचं नातं एकत्रचं तुटलं; तरुणीच्या हातातलं ब्रेकअप पोस्टर पाहिलं का?

व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. अनेकजण व्हिडीओचे कौतूक करत आहे. व्हिडीवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहे. एकाने लिहिले की, “जगात अनेक प्रतिभावान लोक आहे जे स्वत:च्या सामान्य गरजा देखील पूर्ण करू करू शकत नाही.” “कौशल्य स्टेजपेक्षा रस्त्यावर जास्त पाहायला मिळते.” असेही एकाने म्हटले आहे.