जेव्हा आपण बाजारात कोणतही वस्तू खरेदी करायला जातो तेव्हा प्रयत्न करतो की आपण नेहमी काहीतरी चांगले खरेदी करू शकतो. कपडे खरेदी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा आपण काहीतरी वेगळे आणि चांगले शोधत असतो जेणेकरून इतरांमध्ये उठून दिसतील. जीन्स असो की टी शर्ट आपण जी सर्वोत्तम आहे तेच खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. कपडे घेताना आपण नेहमी तपासून घेतो की कपडे फाटलेले नाही नाही पण आजकाल फॅशन इतकी विचित्र आहे की लोक फाटके कपडेच फॅशन म्हणून परिधान करतात.

आतापर्यंत विचित्र जीन्सच्या फॅशन तुम्ही पाहिल्या असतील सध्या अशाच एका विचित्र जीन्सचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका दुकानात एक शॉर्ट जीन्स विक्री करताना दिसत आहे, ही जीन्स इतकी छोटी आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. हा जीन्सची किंमत पाहून तुम्हाला धक्का बसेल. व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांना प्रश्न पडला आहे की, “ही असली जीन्स कोण वापरणार?”

हेही वाचा – “आजीची माया अशी, मुरंब्याची गोडी जशी…” मुंबईवरुन आलेल्या नातवाला पाहून आजीचा आनंद गगनात मावेना, हृदयस्पर्शी VIDEO एकदा पाहाच

व्हिडीओमध्ये जी जीन्स दिसते ते पाहूनच स्पष्ट होते की अत्यंत छोटी आहे. जीन्सचे बक्कल आणि बेल्ट लावता येईल एवढीच जीन्स आहे. ही जीन्स सुरू झाल्यावर लगेच संपते आहे. ही विचित्र जीन्स पाहून लोकांना प्रश्न पडला आहे की ही कोणती फॅशन आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या जीन्सचा फोटो ट्विटरवर desi mojito नावाच्या अकांउटवर शेअर केली आहे. व्हायरल व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये, “का?” एवढेच लिहिले आहे. जीन्स आणि तिची किंमत पाहून नेटकरी चक्रावले आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करून खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा – कटरने सिलेंडर कापताच झाला नाही स्फोट तर पडला चक्क पैशांचा पाऊस; पाहा Viral Video

एकाने कमेंट करताना लिहिले की, “हे कोणी वापरू शकते काय?” तर आणखी एकाने लिहिले, मला फुकट दिली तरी ही जीन्स वापरणार नाही”