Petrol Pump Accident Video : पेट्रोल पंपावर गाडीमध्ये पेट्रोल, डिझेल भरताना एक छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. पेट्रोल पंपांवर बऱ्याचदा ज्वलनशील वस्तू पंपावर आणू नयेत, असा इशारा देणारे सूचना फलक लावलेले दिसतात. त्याशिवाय पेट्रोल भरताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन करणारे फलकही काही वेळा पेट्रोल पंपांवर पाहायला मिळतात. मात्र, तरीही काही लोक निष्काळजीपणा करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात दोन तरुण बाईकमध्ये पेट्रोल भरून निघतानाच त्यांच्याकडून एक चूक होते, जी चूक एका तरुणाच्या जीवावर बेतते.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण बाईकवर बसून एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना दिसत आहेत. पेट्रोल भरून बाईक पुढे नेताच पेट्रोलचा पाईप बाईकमध्ये अडकून तुटतो. यावेळी मागे बसलेला तरुण बाईकवरून उतरून पाईप दूर करणार इतक्यात बाईक पेट घेते. आग लागताच मागे बसलेला तरुण तिथून पळून जातो आणि पुढे बसलेला तरुण आगीत होरपळून निघतो. व्हिडीओतील ही दृश्यं खूप भीतीदायक आहेत.

Nagpur, Sexual harassment,
‘तुझे न्यूड फोटो पाठव…’, पिस्तुलाच्या धाकावर ठाणेदाराने…
intimate scene
आईने सहा वर्षाच्या चिमुरड्याकडून शूट करून घेतला प्रियकराबरोबरचा खासगी व्हिडीओ, नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर
thief revealed in front of vasai police committed 65 house burglaries
वसई : वय ३६ चोऱ्या केल्या ६५; अवलिया चोर पोलिसांच्या जाळ्यात
This is why experts warn against storing your toothbrush in the bathroom
तुम्ही तुमचा टूथब्रश कुठे ठेवता? बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणाऱ्यांना तज्ज्ञांचा इशारा
nagpur, acid attack, acid attack in Nagpur, Girlfriend Throws Acid on Boyfriend's Face, Girlfriend Boyfriend Argument, Severe Injuries Reported, Nagpur crime news, crime in Nagpur, Nagpur accid attack case,
नागपुरात ॲसिड हल्ला; प्रेयसीने प्रियकराच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले
Nagpur, Kunal, murde, alcohol,
नागपूर : मित्रांनी दारूच्या वादातून केली कुणालची हत्या.. वानाडोंगरीतील घटनेचा अखेर उलगडा
Father-daughter love
बाप असावा तर असा…! लेकीच्या घटस्फोटानंतर वाजत-गाजत आणलं घरी! वडिलांच्या ‘या’ कृतीचा समाजाने का घ्यावा आदर्श?
Women Manipur violence Update
Manipur Violence : “पीडित महिला पोलिसांच्या वाहनात बसल्या, पण…”; नग्न धिंडप्रकरणी सीबीआयच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे

काही वेळाने आगीत होरपळलेला तरुण त्यातून पळत येताना दिसतोय. त्याच्या पाठीवर आग लागल्याचे दिसतेय.

@pande15rohit नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे; ज्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की… तो मरण पावला असेल बिचारा. आणखी एका युजरने लिहिले… देवाने असे मित्र कोणालाही देऊ नयेत. तर तिसऱ्या युजरने लिहिले की… देवाचे आभार मानतो की, तो वाचला.