Viral Video : लग्न समारंभात अनेक प्रथा आणि परंपरा दिसून येतात. हळद, संगीत, मेहेंदी आहेर इत्यादी परंपरा जपत लग्न सोहळा पार पडतो. लग्नाचा आहेर घेताना सहसा पैसे दिले जातात. अशातच एका नवरीने लग्नाचा आहेर घेण्यासाठी चक्क हातावर क्युआर कोड कोरला. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हातावरील मेहेंदीमध्ये या नवरीने ज्याप्रकारे क्युआर कोड कोरला आहे, ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायल व्हिडीओमध्ये तुम्हाला नवरीचा हात दिसेल. तिच्या हातावर सुंदर मेहेंदी काढली आहे. मेहेंदीच्या अगदी मधोमध क्युआर कोड कोरला आहे. हा कोड पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या व्हिडीओमध्ये म्हटलेय, “जेव्हा लग्नामध्ये गिफ्ट विसरला तेव्हा तुम्ही हे करा. व्हिडीओत दिसते की मेहेंदीमध्ये कोरलेल्या क्युआर कोडला एक महिला स्कॅन करतेय आणि त्यावर फक्त ११ रुपये टाकते पण त्यानंतर नवरी लगेच फोन हातात घेऊन ५००१ रुपये टाकते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही मजा येईल. काही लोकांना प्रश्न पडेल की खरंच मेहेंदीने क्युआर कोड स्कॅन करता येतो का?

हेही वाचा : “कधी सुधारणार लोकं?” पान थुंकून रेल्वे स्टेशनवरील लिफ्ट केली अस्वच्छ, फोटो पाहून नेटकरी संतापले…

हा व्हिडीओ गुगलने त्याच्या googleindia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आहेर मागण्याची पद्धत सामान्य आहे, नाही का?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पैसे मागण्याची पद्धत थोडी टेक्निकल आहे” तर एका युजरने लिहिलेय, “डिजिटल इंडियाचे डिजिटल लग्न” या व्हिडीओवर जीवनसाथी डॉट कॉमच्या अधिकृत अकाउंटवरून सु्द्धा कमेंट आली आहे. त्यात लिहिलेय, “लग्नासाठी ही खास आयडिया जपून ठेवा.” आणखी एका युजरने लिहिलेय, “जे या वर्षी लग्न करणार आहेत त्यांनी मी हा व्हिडीओ पाठवते” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. अनेक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर तीन लाख हून व्ह्युज आहेत.