सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यामुळे आपलं मनोरजंन होतं. तर काही व्हिडीओ आपणाला काहीतरी शिकवून जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विनाकारण प्राण्यांना त्रास देणाऱ्यांना चांगला धडा मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल माणूस जसं कर्म करतो तसंच फळ मिळतं. शिवाय हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मुक्या प्राण्यांना विनाकारण त्रास देणं अनेकजण बंद करतील. कारण, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन तरुण दुचाकीवरून जात असताना रस्त्यामध्ये त्यांना म्हैस दिसते, पण या मुलांना ती म्हैस शांतपणे पुढे जात असल्याचं बघवत नाही. दुचाकीच्या मागच्या सीटवर बसलेला एक तरुणाने विनाकारण म्हशीला लाथ मारतो. पण त्याने लाथ मारल्यावर पुढं असं काही घडलं आहे की, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

हेही पाहा- इमारतीच्या छतावर विटा नेण्यासाठी कामगारांनी शोधली भन्नाट आयडीया; नेटकरी म्हणाले, ‘क्रिएटीव्हीटीला सलाम’

कारण, व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दुचाकीवरून निघालेले दोन तरुण एका म्हशीला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. दुचाकीच्या मागच्या सीटवर बसलेल्या तरुणाने म्हशीला पायाने लाथ मारण्याचा प्रयत्न करतो खरा, पण त्यांचा डाव त्यांच्याच अंगलट येतो आणि क्षणात ते दोघेही रस्त्यावर पडतात. त्यामुळे केलेल्या कर्माचं फळ भेटतं पण एवढ्या लवकर भेटतं हे माहिती नव्हतं असं नेटकरी म्हणत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ dc_sanjay_jas नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन मध्ये लिहलं आहे की, “कर्माचे फळ निश्चित मिळतं, पण कधी कधी ते एवढ्या पटकन मिळते की, तुम्ही स्वतःच बघू शकता.!” हा व्हिडीओ १९ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

हेही वाचा- Ludo च्या नादात नवऱ्याला कंगाल करुन बाईने स्वतःचीच लावली बोली; आता नाईलाजास्तव घरमालकासोबत…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर मुक्या प्राण्यांना विनाकारण त्रास देऊ नये, अशा कमेंट देखील नेटकरी या करत आहेत. शिवाय एका नेटकऱ्याने लिहलं आहे की, ‘जर तुम्ही कोणाचे वाईट केले तर तुमचेही वाईट होईल’ त्यामुळे हा व्हिडीओ मुक्या प्राण्यांना विनाकारण त्रास देणाऱ्यांसाठी एक धडा असल्याचंही म्हटंल जातं आहे.