Video : नुकताच गणेशोत्सव सगळीकडे उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गणपतीच्या या १० दिवसांमध्ये अनेक तरुण मंडळी गणपतीच्या मंडपात दिवसरात्र मेहनत करतात. तिथेच जेवतात आणि तिथेच झोपतात.
गणपतीच्या मंडपात झोपलेल्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या चिमुकल्याची त्याच्या मित्रांनी मध्यरात्री फिरकी घेतली आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, एक चिमुकला गणपतीच्या मंडपात अगदी शांतपणे झोपलेला आहे. मूर्तीसमोर झोपलेल्या या चिमुकल्याला पाहून काही तरुण मंडळी त्याची मजा घेण्याचे ठरवतात. ही तरुण मंडळी या चिमुकल्याला आरती सुरू असल्याचे दाखवत अचानक उठवतात.
झोपेत असलेल्या या चिमुकल्याला वाटतं की खरंच आरती सुरू आहे. त्यामुळे तो चक्क झोपेत गणपतीची आरती म्हणायला सुरुवात करतो, तेव्हा मध्यरात्रीचे ३ वाजलेले असतात. चिमुकल्याला झोपेत आरती म्हणताना पाहून सर्व जोरजोराने हसायला सुरुवात करतात. त्यानंतर थोड्या वेळाने चिमुकल्याला कळते की हे सर्व मित्र मिळून त्याची फिरकी घेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prashant? (@old_schoolidiot)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : याला म्हणतात नशीब! मालकीणबाई करतेय कुत्र्याची मालिश, व्हायरल VIDEO एकदा पाहाच

old_schoolidiot या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जेव्हा आरती रात्री ३ ला सुरू होते… गणपती बाप्पा मोरया.”