Viral Video : सोशल मीडियावर अनेक जुने नवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात तर काही व्हिडीओ जुन्या आठवणी ताज्या करतात. सध्या असंच एक जुनं गाणं व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला हे गाणं गाताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना लहानपणीची आठवण येईल. कारण काही वर्षांपूर्वी हे गाणे प्रचंड गाजले होते. घरोघरी हे गाणे पोहचलं होते. “विसरू नको रे आई बापाला झिजविली ज्यांनी काया ” हे लोकप्रिय गीत ऐकले आहे का? या व्हिडीओमध्ये हा चिमुकला हे गाणे गात आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकला गोड गाणं म्हणत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल.
चिमुकला ताला सुरात गाणं म्हणताना दिसतो,

“तुला मिळेल पैसा पोर गणगोत्र मित्र परिवार
स्वार्थाने गुरफटलेला हा मायेचा बाजार
विसरू नको रे आई बापाला झिजविली ज्यांनी काया
काया झिजवून तुझ्या शिरावर पडली सुखाची छाया
रे वेडया मिळणार नाही तुला आईबापाची माया
मिळणार नाही तुला आईबापाची माया”

हेही वाचा : ‘तू माझी झाली नाहीस तर…’ लग्नास नकार दिल्याने महिलेची भररस्त्यात तलवारीने वार करून हत्या; थरारक VIDEO समोर

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : रील्सचा नाद लय बेकार! सिलेंडरवर चढून महिलेचे ठुमके पण पडली तोंडावर VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “तुझे दात कसे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. काही लोकांना त्यांचे आईवडील आठवतील तर काही लोकांच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. आई वडिलांची महती सांगणारा हा व्हिडीओ पाहून काही लोकांच्या डोळ्यांत पाणी येऊ शकते. भावूक करणारा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खूप जूना आहे जो सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चिमुकल्या मुलाने गाण्यातून आजची परिस्थिती रेखाटली” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काय आवाज आहे पठ्याचा” तर एका युजरने लिहिलेय, “माझ्या कडे बटणाचा मोबाईल होता त्या मध्ये ऐकले होते मी हे साँग…” आणखी एका युजरने लिहिलेय, “2 g च्या काळातील आवाज” एक युजर लिहितो, “२०१२-१३ हा व्हिडीओ आहे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही लोकांनी सांगितले की या चिमुकल्याच्या गाण्यामुळे त्यांना आईवडील रागवायचे.