Viral video: सासू सुनेचे नाते हे आपल्याकडे सर्वात जास्त चघळला जाणारा विषय आहे … संसार म्हटला की, भांड्याला भांडे लागणारच आणि सासू सुनेचं नातं म्हटलं की, त्याकडे कधी चांगल्या नजरेने पाहिलं जाणं जरा कठीणच आहेसासू-सुनेचे नाते हा प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनाचा भाग असतो. भारतीय संस्कृतील सासू-सुनेचे नाते अत्यंत संवेदनशील मानले जाते. अनेकदा लग्नानंतर सासू-सुनेमध्ये खटके उडतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. बदलत्या काळानुसार हल्ली सासू-सुनेच्या नात्यामध्येही बदल दिसून येत आहे. त्या एकमेकींना समजून घेताना दिसत आहेत.

लग्नापुर्वी अन् लग्नातही नवरीला सर्वात जास्त कोणाची भीती वाटत असेल तर ती म्हणजे सासू. आपली सासू कशी असेल याची धाकधुक प्रत्येक नवरीला असते. पण समजा हीच सासू अगदी आईसारखी असली तर…सध्या एका सासू सूनांचा व्हिडीओ व्हायरल होतोय त्यामध्ये सासूबाईंच्या वाढदिवशी सुनेनं खास पत्र लिहलं आहे. हे पत्र वाचून सासूबाईंसह सर्वांनाच अश्रू अनावर झाले आहेत. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सासूबाईंच्या वाढदिवशी सुनेनं खास पत्र लिहलं आहे. यामध्ये लग्न झाल्यापासूनच्या सगळ्या गोड-कडू आठवणी, वाद आणि चढ-उतार याबद्दल तिनं लिहलं आहे. सासूबाई कधी दाखवत नाही मात्र त्यांचं कित प्रेम आहे हे सुनेनं सांगण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, सून असावी तर अशी. अनेक सासू आणि सूनेच्या नादात मज्जा कमी आणि वाद जास्त असतात. हे अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. अनेक सून सांगतात की सासू आपल्याला आपल्या मुलीसारखी का वागवत नाही. तर सून आपल्याशी आईसारखी वागणूक का देत नाही, अशी सासूची तक्रार असते. मात्र, काही घरांमध्ये सासू-सुनेचे नाते खूपच मस्त असते, याचे ताजे उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हयरल झालेला हा व्हिडीओ.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्याही नात्यात एकमेकांचा आदर करणे खूप जास्त गरजेचे आहे. सासू-सुनेच्या नात्यातही तसेच आहे. सुनेने सासूचा आदर केला पाहिजे आणि आणि सासूने सुनेला मुलीप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. सोशल मीडियावर @hemangipatil_makeupartist या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “अशी सून मिळायला नशीब लागतं”