मद्यपान हे आरोग्यासाठी वाईट आहे प्रत्येकाला माहित आहे. मद्यपानामुळे आरोग्यावर परिणाम होतोच पण दारूच्या नशेत लोक काय करतात याचे भान त्यांना राहत नाही. मद्यपान करून भररस्त्यात तमाशा करणाऱ्यांचे अनेकदा सोशल मीडियाव व्हिडिओ व्हायरल होतात. अनेकदा लोक दारूच्या नशेत स्वत:च जीवही धोक्यात टाकतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

पुणे तिथे काय उणे म्हणतात ते उगाच नाही. पुण्यात कधी काय होईल याचा नेम नाही. पुणेकर नेहमीच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतातच पण पुण्यातील मद्यपी देखील चर्चेत आले आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध एका दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीचा व्हि़डीओ चर्चेत आला आहे. मद्यपी व्यक्ती भररस्त्यात जे काही करत आहे ते पाहून पुणेकरांनाही हसू आवरणे अशक्य झाले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे दिसते. एवढेच नाही तर दारूच्या नशेत हा व्यक्ती चक्क पुश-अप्स मारताना दिसत आगे. . या घटनेचा व्हिडिओ शनिवारी एका रेडिट वापरकर्त्याने शेअर केला. “अंडा भुर्जीसाठी आलो, फिटनेस मास्टरक्लाससाठी थांबलो,” असे विनोदी कॅप्शन पोस्टला देण्यात आले.
व्हायरल व्हिडिओ पहा:

व्हिडिओमध्ये पाहू शकता, दारूच्या नशेत असलाल व्यक्ती रस्त्याच्या मधोमध पुश-अप्स करताना दिसतो. आजुबाजुने वाहन जात आहेत, ज्यामुळे त्याचा आणि इतंराचा जीवाला धोका निर्माण होत आहे याचे देखील त्याला भान राहिलेले नाही. तो काय करतो आहे हे देखील त्याला समजत नाही. आसपासचे लोक मद्यपीची मजा घेत आहे आणि तो काय करतो आहे पाहत तेथेच उभे आहेत. रस्त्यावर फारशी वाहने नसल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. दरम्यान ही घटना रात्री उशिरा घडल्याचे दिसून येते.

पाहा Video

The drunken master (Swargate apr 5, 2025)
byu/Impossible-Repair-37 inpune

नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

“सर्व वाहतूक हळूहळू त्याच्याभोवती फिरत आहे. आपल्याला त्याच्यासारख्या फिटनेस फ्रीकना फूटपाथवर ठेवण्याची गरज आहे. कोणीही त्यावर गाडी चालवण्याची हिंमत करणार नाही,” एका वापरकर्त्याने कमेंट केली.

“तुम्ही लोकाना समजत नाहीये. तो पुश-अप्स करत नाहीये, तो रस्ता खाली ढकलत आहे. कॅमेरा अँगल ते दाखवत नाही,” दुसऱ्या वापरकर्त्याने विनोद केला.

“ एका खंब्याची(दारुच्या बाटलीची) खरी क्षमता जाणणाऱ्या माणसाला काहीही हरवू शकत नाही,” तिसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली.

शेवटी मद्यपान करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे हे सर्वांनी विसरू नये.