poster viral: ‘मुलाला शेती पाहिजे; पण तो शेतकरी नवरा नको आहे. पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी नोकरी करणारा असावा. शहरात स्थायिक असावा. अशी मानसिकता मुलींबरोबर त्यांच्या आई-वडिलांचीही झाली आहे. तर मुलाचे लग्न ठरत नसल्याने शेतकरी मातापित्याच्या जिवाला घोर लागला आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था मुलांचे विवाह जमत नसल्याने बिकट झाली आहे. दरम्यान याच सगळ्या अपेक्षांना वैतागलेल्या एक शेतकरी तरुण पोस्टर घेऊन थेट चौकात पोहचला आहे. या पोस्टरवर असं काही लिहलंय की वाचून तुम्हीही या तरुणाचं कौतुक कराल. सध्या या तरुणाचा पोस्टर घेऊन असलेल्या फोटो जोरदार व्हायरल होतोय.

लग्नासाठी मुलाकडून प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना या तरुणानं चोख उत्तर दिलंय. भर चौकात तरुण हातात पोस्टर घेऊन उभा आहे. येणारे जाणारे सगळे लोक हे पोस्टर पाहून थांबत आहेत. आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय या पोस्टरवर ? तर या तरुणानं या पोस्टरवर “शेती प्रॉपर्टी म्हणून पहिजे, पणे- शेती करणारा नको, #नवरदेव B.S.C AGRI” असा टोला लिहला आहे.

मुलींच्या अपेक्षाही मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यामुळे शेती करणाऱ्या मुलास मुली मिळणे दुरापास्त झाले असल्याचे चित्र आहे. शेती तर पाहिजेच, पण मुलगा शेतकरी नको!, अशी सध्या सर्व मुलींच्या पालकांची अपेक्षा आहे. दुसरीकडे हुंडा नको मुलगी मिळाली तरी पुरे, अशी मुलाच्या पालकांची अपेक्षा आहे. पण जे मुलं फक्त शेतीच करतात त्यांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे. मुलीच्या लायकीचा मुलगा मिळत नाही, तर शेतकरी मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार नसल्याने मुला मुलीचे वयही वाढत जात आहे.शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुलींच्या पालकांना वाटते की सरकारी नोकरदार किंवा शहरी भागात वास्तव्य असलेला गलेलठ्ठ पगाराचा खासगी नोकरदार जावई म्हणून मिळावा.

पाहा पोस्ट

हेही वाचा >> VIDEO: पुणेकरांचा नादच खुळा…नोकरीचा राजीनामा देत बॉसला खुन्नस; ऑफिसबाहेर ढोल-ताशा वाजवत केला जल्लोष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावोगावी शेतीचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. नोकरी आज आहे तर उद्या नाही. जमीन पिढ्यान् पिढ्या राहणार आहे. शेती तोट्यात असणारी भविष्यात फायद्यात येईल तर मुलींनी स्वतः पुढे येऊन शेतकरी मुलाला लग्नाला होकार दिला पाहिजे. हा फोटो aditya_agricultur_college_beed या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केलीय की, “एकदम बरोबर”, तर दुसऱ्यानं कमेंट केली की, “वावर हाय तर पावर हाय.”