सध्या सोशल मीडियावर अनेक जंगली प्राण्यांचा माणसांची वस्ती असणाऱ्या भागात वावर वाढल्याचं आढळून येत आहे. जंगली प्राणी सतत शहरात किंवा मनुष्य वस्तीमध्ये येण्यास सततची जंगलतोड कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. कारण, जंगलतोड झाल्यामुळे वनक्षेत्र कमी होत आहे आणि औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. औद्योगिकीकरणासाठी बेसुमार झाडे तोडली जातात त्यामुळे वन्य प्राणी शिकारीसाठी जंगलाच्या परिसरातून बाहेर पडल्याचं दिसूत येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही पाहा- रिक्षाचालकाने चक्क दोन चाकांवरच पळवली रिक्षा, घटनेचा थरारक Video होतोय व्हायरल

बिबट्या, हत्ती, वाघ, वळू असे अनेक प्राणी मानवी वस्तीत शिरल्याच्या अनेक घटना आपण सोशल मीडियाद्वारे पाहिल्या आहेत. शिवाय जंगलातून मानवी वस्तीत आलेल्या प्राण्यांनी अनेक लोकांते जीव घेतल्याचं किंवा जखमी केल्याच्या घटनाही समोर येत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बिबट्या मानवी वस्तीत घुसला असून तो लोकांवर हल्ला करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

हेही पाहा- कबुतराला वाचवण्यासाठी पोलिसाने स्वत:चा जीव घातला धोक्यात, विजेच्या टॉवरवर चढल्याचा Video होतोय व्हायरल

शिवाय जो कोणी या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे त्याला बिबट्या जखमी करत आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बिबट्या ग्रामीण भागात शिरल्याचं दिसतं आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे लोक भीतीने इकडे-तिकडे पळताना दिसत आहेत.

प्राणी आणि मानव यांच्यातील भयंकर संघर्ष दाखविणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ Vicious Videos नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ २३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. शिवाय अशा घटना घडू नये यासाठी वेळीच जंगलतोड करणं थांबवायला हवं असं प्राणीप्रेमी म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A leopard that entered the human habitat attacked people the video of the incident has gone viral jap
First published on: 03-01-2023 at 18:18 IST