scorecardresearch

पार्टीतील तो डान्स अखेरचा ठरला; हृदयविकाराचा झटका आला अन्…, घटनेचे CCTV फुटेज व्हायरल

तरूणांपासून वयस्कर लोकांपर्यंत अनेकजणांना हृदयविकाराच्या समस्येमुळे आपला जीव गमवावा लागत आहे.

Death due to heart attack
सध्या हृदयविकाराचा झटक्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. (Photo : Twitter)

हृदयविकाराचा झटक्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हल्ली बरेच वाढले आहे. तरूणांपासून वयस्कर लोकांपर्यंत अनेकजणांना हृदयविकाराच्या समस्येमुळे आपला जीव गमवावा लागत आहे. शिवाय हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झालेल्यापैकी अनेकांचा मृत्यू डान्स करताना, क्रिकेट खेळताना किंवा जिममध्ये व्यायाम करताना झाल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. सध्या मध्य प्रदेशातील भोपाळमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये टपाल विभागाच्या सहाय्यक संचालकाला डान्स करताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांतच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त आतजकने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना १६ मार्च रोजी घडली आहे. शिवाय ते डान्स करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोस्टल विभागाकडून अखिल भारतीय पोस्टल हॉकी स्पर्धेचे आयोजन १३ ते १७ मार्च दरम्यान भोपाळ येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर करण्यात आले होते. स्पर्धेचा अंतिम सामना १७ मार्चला होणार होता. या सामन्याच्या एक दिवस आधीच म्हणजे १६ मार्चला संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही पाहा- स्टेशनवरील LED स्क्रिनवर अचानक पॉर्न Video चालू झाला अन्…, रेल्वेचा भोंगळ कारभार; प्रवाशांची शरमेने झुकली मान

हेही पाहा- बसमध्ये महिलांना ५० टक्के सवलत; कंडक्टरची तिकीट काढण्यासाठी कसरत, Video पाहून पोट धरुन हसाल

या कार्यक्रमादरम्यान भोपाळ टपाल विभागाच्या सहाय्यक संचालक सुरेंद्र कुमार दीक्षित आपल्या सहकाऱ्यांसोबत डान्स करत होते. डान्स करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जमीनीवर कोसळले. उपस्थित सहकाऱ्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्याचा श्वासोच्छवास बंद झाला होता.

संपुर्ण घटना कॅमेऱ्यात कैद –

सुरेंद्र कुमार आपल्या साथीदारांसोबत डान्स करत असताना तिथे उपस्थितांपैकी एक माणूस त्याचे व्हिडिओ शूट करत होता. याचवेळी दीक्षित यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली पडले, ही सर्व घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली. व्हिडीओमध्ये ते ‘आपका क्या होगा जनाब-ए-आली…’ या बॉलीवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या घटनेनंतर त्यांच्या साथीदारांनी खूप हळहळ व्यक्त केली असून या घटनेमुळे दिक्षित यांच्या कुटुंबीयांना खूप मोठा धक्का बसला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 15:10 IST

संबंधित बातम्या