a man won the lottery worth more than 6 thousand crores powerball jackpot lottery | Loksatta

एका रात्रीत एक दोन नव्हे तब्बल ६ हजार २४३ कोटींचा बनला मालक, निमित्त ठरली ‘ही’ एक गोष्ट

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांचे एका रात्रीत नशीब पालटल्याच्या बातम्या वाचत आणि पाहत असतो

biggest lottery winner 2023
या व्यक्तीने जिंकलेली रक्कम ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत. (Photo : Indian Express)

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांचे एका रात्रीत नशीब पालटल्याच्या बातम्या वाचत आणि पाहत असतो. सध्या अशीच एक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीचे नशीब लॉटरीच्या तिकिटामुळे एका रात्रीत बदलले आहे. शिवाय या व्यक्तने एक दोन कोटी नव्हे तर तब्बल 6 हजार २४३ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. या व्यक्तीनेजिंकलेली रक्कम ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत. मात्र, लॉटरी जिंकलेल्या विजेत्याची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने पॉवरबॉल जॅकपॉट बक्षीस अंतर्गत पाचव्या क्रमांकाची सर्वोच्च रक्कम जिंकली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या लॉटरी जॅकपॉट इतिहासातील ही नववी सर्वात मोठी रक्कम आहे. पॉवरबॉल जॅकपॉटच्या इतिहासातील सर्वात मोठे लॉटरीची रक्कम ही १६ हजार ८८० कोटी रुपये इतकी होती. ती रक्कम ७ नोव्हेंबर २०२२ रोजी कॅलिफोर्नियातील एका व्यक्तीने जिंकली होती.

हेही वाचा- “माझी काडीपेटी परत करा अन्यथा…” वीज विभागाच्या कार्यालयात डेंजर वाद; Viral पत्र पाहून पोट धरुन हसाल

एबीसी न्यूजच्या रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीने एकाच वेळी लॉटरीची बक्षीस रक्कम निवडली तर त्याला ३ हजार ३६९ कोटी मिळतात. त्यामुळे एवढी रक्कम त्याला एकाच वेळी दिली जाईल. परंतु जर त्याने अनेक वर्षे हप्त्यांमध्ये पैसे घेण्याचे ठरवले तर त्याला ६२ हजार ४३ कोटी रुपये मिळतील. पॉवरबॉल जॅकपॉट लॉटरीचा ड्रॉ यावर्षी प्रथमच जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी, १९ नोव्हेंबर २०२२ रोजी लॉटरी जॅकपॉटची विजयी रक्कम ७६८ कोटी रुपये होती.

हेही पाहा- Video: पुजेदरम्यान घंटी सापडली नाही म्हणून तरुणाने केला भलता जुगाड, नेटकरी म्हणाले “अरे देवाला तरी…”

अनेक लोक झाले श्रीमंत –

पॉवरबॉल जॅकपॉट अंतर्गत विजयी क्रमांक ५, ११, २२, २३ आणि ६९ आणि ७ होते. त्यापैकी मिशिगनमध्ये दोन आणि न्यूयॉर्कमध्ये ३ तिकीटांची विक्री झाली. ज्या व्यक्तीचे हे पाचही आकडे पांढऱ्या चेंडूवर जुळले होते, त्याला ८ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर टेक्सासमध्ये ‘पॉवर प्ले ऑप्शन’ अंतर्गत तिकीट विकण्यात आले होते ज्याची त्याची बक्षीस रक्कम १६ कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय, अशी ५८ तिकिटे देखील होती, ज्यांनी ती खरेदी केली त्यांना ४० लाख रुपयांपेक्षा जास्त बक्षीस मिळाली आहेत. तर १६ लॉटरी तिकीटधारकांना ८० लाख रुपयांहून अधिक बक्षीस रक्कम मिळाली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 17:43 IST
Next Story
गर्दीत बॅगेचा उल्लेख होताच बेशुद्ध राखी सावंतने उघडले डोळे, Video व्हायरल