Viral video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक लातूरमधला लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. या अपघातामुळे एका निष्पाप व्यक्तीला वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. नेरुळमधील राजीव गांधी पुलाखाली वडापाव विकणाऱ्या विक्रेत्याला मोटारसायकल चालकानं धडक दिली आणि सर्व तेल या व्यक्तीच्या अंगावर उलटलं. यामध्ये त्याला प्रचंड भाजलं असून त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्यक्तीला गरम तेल अंगावर पडल्यामुळे प्रचंड भाजलं आहे आणि तो वेदनेनं विव्हळत आहे. या व्यक्तीला होणारा त्रास या व्हिडीओमध्ये दिसत असून व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाच चर्र होईल. एका मोटारसायकल चालकाच्या चुकीमुळे या निष्पाप व्यक्तीला हे सहन कराव लागत आहे. तो रस्त्यावर उभा आहे आणि अंगाला तेल लावत आहे मात्र त्याला प्रचंड वेदना होत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.

या भीषण अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. एका मोटारसायकल चालकाची शिक्षा या विक्रेत्याला भोगावी लागली आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि सांगा यामध्ये चूक कुणाची?

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. sarkarraj______ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “बिचारा काही चूक नसताना त्याला आता एवढा त्रास सहन करावा लागतोय, देवा इतकं वाईट कुणासोबतच होऊ नये” तर काही जणांनी, “सर्व प्रथम अनधिकृत धंदे बंद करा.. कधी कोणती जीवित हानी होईल सांगता येणार नाही..” “सर्व अनधिकृत धंदे बंद करावे. सेक्टर दोन सेक्टर १० पूर्ण रस्त्याच्या साईडला गाड्या पार्किंग असतात. माणसांना चालायला जागा नसते” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.