सोशल मीडियावर जेलर या तमीळ चित्रपटातील कावला हे गीत चांगलेच व्हायरल होत आहे. या चित्रपटात रजनीकांत मुख्य भूमिकेत असून, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी यातील ‘कावला’ या गीताची सगळीकडे चर्चा सुरू आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच या गीतावर रिल्स बनवताना दिसत आहेत.

अभिनेत्री तमन्ना भाटियाने या गाण्यावर खूप सुंदर डान्स केला आहे. अनेक जण तिच्यासारखा डान्स करीत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. अशातच एका आजीने तमन्नालाही मागे टाकले आहे. या गाण्यावर आजी जबरदस्त डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

हेही वाचा : वन, टू, थ्री म्हणण्याच्या नादात इलेव्हन नंतर म्हणाला…; चिमुकल्याचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक तरुण आजी ‘कावला’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. आजीच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव अगदी थक्क करणारे आहेत. आजीची ऊर्जा पाहून तुम्हीही आजीचे चाहते व्हाल. सध्या या डान्सचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sidbobadi21 या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एक नंबर; आजीची ऊर्जा पाहून मी थक्क झालो.” तर एका युजरने लिहिलेय, “अविश्वसनीय, खूप सुंदर.” आणखी एका युजरने लिहिलेय, “या आजीला दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!”