आपल्यापैकी अनेक लोक असे असतील जे उंदराच्या त्रासाला कंटाळलेले असतील, किंवा त्यांचे उंदरांमुळे काहीतरी नुकसान झालेलं असेल. कारण उंदीर आपल्या सान्निध्यात येणाऱ्या सर्व वस्तू कुरतडून टाकतात. मग ते कधी आपले कपडे कुरतडतात तर कधी महत्वाची कागदपत्रं. त्यामुळे घरात आणि ऑफिसमधील उंदरांना अनेकजण त्रासलेले असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उंदरांना पळवून लावण्यासाठी लोक वेगवेगळ्या युक्त्या वापरत. ज्यामध्ये कोणी उंदीर पकडण्याचा सापळा घरात किंवा ऑफिसमध्ये लावतात तर काहीजण उंदीर मारायची औषधं आणून ते एखाद्या पदार्थाला लावून ठेवतात. जेणेकरुन उंदरांनी तो पदार्थ खाल्यानंतर ते मरावेत. पण सध्या एका व्यक्तीने उंदरांना पळवून लावण्यासाठी असं काही केलं आहे. जे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

हेही पाहा- भाकरी नळाला धुवून खाणाऱ्या आजोबांचा Video पाहून नेटकरी झाले भावूक; म्हणाले “परिस्थितीला कधीच…”

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती उंदरांना पळवून लावण्यासाठी अनोखा प्रयत्न करताना दिसत आहे. शिवाय त्याच्या या युक्तीमुळे सर्व उंदीरही पळून जाताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने उंदीर असलेल्या एका खोलीला बोर्डाने झाकून त्यात छिद्र पाडल्याचे दाखवण्यात आले आहे. या छिद्रातून हा माणूस एक कोब्रा साप आत सोडतो. त्यानंतर सर्व उंदीर या सापाच्या भीतीने छिद्रातून बाहेर पडताना दिसत आहेत.

हेही पाहा- शिकारीच्या शोधात असलेल्या मांजरावर अजगाराने झडप घातली अन्…, अंगावर शहारा आणणारा Video होतोय व्हायरल

व्हिडिओमध्ये सर्व उंदीर एक एक करून बाहेर पडत आहेत आणि ही व्यक्ती त्यांना बादलीत भरत आहे. हा प्रयोग तसा सर्व लोकांना करता येण्यासारका नाहीये. मात्र, व्हिडीओमध्ये उंदीर पळाल्याचं पाहून ज्यांना उंदराचा त्रास सहन करावा लागला आहे, ते लोक खूप खूश झाले आहेत. शिवाय अनेकांनी या व्हिडीओतील व्यक्तीचं कौतुक केलं आहे. तर कोही लोकांनी हा उपाय कामाचं नसल्याचंही म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A person brought a snake into the house to catch mice see viral video jap
First published on: 18-01-2023 at 19:29 IST