दैव तारी त्याला कोण मारी, असं म्हणतात. गुजरातमधील हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही याचा प्रत्यय येईल. नशीब बलवत्तर होतं म्हणून भीषण अपघातातून हे कुटुंब थोडक्यात बचावलं. एएनआयवृत्तसंस्थेनं या अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

दुचाकीवरून जात असलेल्या कुटुंबाला टेम्पोनं धडक दिली ही धडक एवढी जबरदस्त की गाडीवर असणारी चालकाची पत्नी आणि दीड एक वर्षांचा चिमुकला मुलगा दूरवर फेकला गेला. धडक देऊन टेम्पो चालक पसार झाला. आश्चर्य म्हणजे यात कुटुंब फक्त किरकोळ जखमी झालं. यातला छोटा मुलगा तर स्वत: उठून काही दूर फेकल्या गेलेल्या आईकडे गेला. थोड्यावेळात आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला, अपघातातून हे कुटुंब थोडक्यात बचावलं असलं तरी काहीवेळ या धक्क्यातून सावरण्यास या कुटुंबाला लागला.