Viral Video : सोशल मीडियावर अनेक मजेशीर पाट्या, बॅनर तसेच सुचना फलक वरील मेसेज व्हायरल होत असतात. काही मेसेज इतके मजेशीर असतात की पोट धरून हसायला येते तर काही मेसेज इतके भावुक करणारे असतात की डोळ्यातून पाणी येते. काही मेसेज जाणीवपूर्वक लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी लिहिले जातात. एका दुकानदाराने सुद्धा त्याच्या दुकानासमोर असेच पोस्टर लावले आहे. हे पोस्टर उधार मागणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. त्याने त्या पोस्टरवर असे काही लिहिले की ते वाचून कोणीही उधार मागणार नाही. नेमकं काय लिहिलेय, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दुकानदार हातात पोस्टर घेऊन म्हणतो, “आज मी उधारी संपवण्याची एक नवीन जुगाड शोधलाय. एका पेपरवर लिहायचे की उधार मागितल्यावर पाच रुपये जास्तीचे लागणार. हा कागद आपल्या दुकानासमोर लावायचा. जे पण ग्राहक माझ्याकडे यायचे ते उधारच मागायचे. पण जेव्हा मी दाखवायला सुरूवात केली त्यानंतर ते कॅश घेऊन यायचे. यामुळे ग्राहकांची उधारी हळू हळू बंद झाली”
या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ज्या ठिकाणी त्याने उधारीसाठी पोस्टर लावले आहे. त्याखाली आणखी एक पोस्टर आहे. त्यावर लिहिलेय, “रात्री ९ वाजल्यानंतर सिगारेट बंद आणि आज पासून तीन वर्षांपर्यंतच्या बाळाला दूध फ्री”
काय लिहिलेय पोस्टरवर?
“सुचना
उधार मागितल्यावर ५ रुपये जास्तीचे लागणार.”
पाहा व्हिडीओ (Viral Video)
vishaalkrlive या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अशा प्रकारे उधारी बंद करण्याचा नवा जुगाड शोधला” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “उधारी बंद होईल किंवा नाही पण या जुगाडमुळे दुकान बंद होईल” तर एका युजरने लिहिलेय, “भावा ज्याला पैसे द्यायचे नाही त्याच्याकडून पाच रुपये किंवा दहा रुपये जास्तीचे घे. त्याला फरक पडणार नाही कारण त्याला पैसे द्यायचे नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “असं करू नको भावा, दुकान बंद होईल” अनेक युजर्सनी या जुगाडचे फायदे आणि तोटे सांगितले आहे.