Viral Video : गावी जायचं असं म्हटल्यावर लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद येतो. रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ काढून आजी-आजोबांसोबत आणि गावच्या घरात निवांत वेळ घालवावा अशी प्रत्येक मुंबईकराची इच्छा असते. तर गावच्या घरांची शोभा ही घरात ठेवलेल्या जुन्या वस्तूंमुळे वाढते; तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात गावाकडच्या जुन्या वस्तूंची एक खास झलक दाखवण्यात आली आहे; जी तुम्हाला पुन्हा एकदा गावाकडच्या आठवणींमध्ये घेऊन जाईल.

व्हायरल व्हिडीओ एका गावातील घराचा आहे. गावातील घरात तुम्ही सगळ्यांनी एकदा तरी पाहिल्या असतील अशा जुन्या वस्तूंची एक झलक दाखवण्यात आली आहे. गावाच्या घरांमध्ये सध्याच्या काळातील मॉडर्न वस्तू किंवा साधने सहसा नसतात. पण, गावाकडच्या घरातील जुन्या गोष्टीच मुंबईकरांना नेहमी आकर्षित करतात. व्हिडीओत तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट जुना टीव्ही दिसेल, जो बघून आपण सगळेच मोठे झालो आहोत. तसेच पुढे वरवंटा, पाटा दिसेल जे पूर्वी स्वयंपाक तयार करण्यासाठी वापरण्यात यायचा. तर जुना फ्रीज, मोठ्या स्टॅण्डचा पंखा, घरात लाईट चालू करण्यासाठी लावण्यात आलेली जुनी बटणं, प्राण्यांसाठी गोठासुद्धा व्हिडीओत दाखवण्यात आला आहे. गावाकडची श्रीमंती एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा… VIDEO : सातासमुद्रापलीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा, जर्मनीत जपताहेत महाराष्ट्राची संस्कृती; व्हिडीओ एकदा पाहाच….

व्हिडीओ नक्की बघा :

हीच खरी श्रीमंती :
जुने ते सोने असते असे अनेकदा आपण ऐकलं असेल. गावाकडच्या घरातील जुने फ्रीज, लाईट चालू करण्यासाठी जुनी बटणे, पाटा, वरवंटा, जातं, मोठ्या स्टॅण्डचा पंखा, प्राण्यांसाठी गोठा या सगळ्या गोष्टी फक्त आपल्याला गावच्या घरांमध्ये पहायला मिळतात. पण, सध्याच्या काळात फ्लॅट टीव्ही, वॉशिंग मशीन, मिक्सर, विविध कंपन्यांचे फ्रीज आदी अनेक साधनांचा रोजच्या जीवनासाठी उपयोग करण्यात येतो. त्यामुळे कुठेतरी या जुन्या साधनांचा अनेकांना विसर पडला आहे. पण, आज या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा एकदा या वस्तू बघू शकता. सध्याच्या काळात नवनवीन गोष्टी बाजारात उपलब्ध असल्या तरीही त्यांना गावाकडच्या जुन्या वस्तूंची सर नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुन्या दिवसांची आठवण करून देणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर @janmakoknatla या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करून ‘हीच खरी श्रीमंती आहे’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. तसेच व्हिडीओवर इंग्रजी अक्षरात ‘ओरिजिनल मध्यमवर्गीय’ असे लिहिण्यात आले आहे. हे पाहून अनेकजण मध्यमवर्गीय नाही, तर सगळ्यात ‘सुखी आणि श्रीमंत’ आहोत असे म्हणत आहेत. ‘सुखाचे दिवस दाखवले भावा’, ‘आमच्या फ्लॅटपेक्षा हेच घर मस्त आहे’, असे अनेक तरुण मंडळीदेखील व्हिडीओखाली कमेंट करताना दिसून येत आहेत.