घड्याळ हातात घालणे जणू एक फॅशनच आहे. घड्याळ घातलं नाही की, अगदीच हात रिकामा वाटू लागतो. बाजारात विविध स्टाईलची घड्याळे उपलब्ध असतात. तर आज एका खास घड्याळाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् (Guinness World Records) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. एक घड्याळ अवकाशातील १२ उल्का खडकांपासून तयार करण्यात आले आहे, असे सांगण्यात येत आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या व्हिडीओमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, लेस एटेलियर्स लुई मोइनेट (Les Ateliers Louis Moinet) नावाची स्वित्झर्लंडची घड्याळ निर्मित कंपनी आहे. या कंपनीने एक खास घड्याळ तयार केलं आहे, ज्यात कंपनीने एक-दोन नव्हे तर १२ उल्कांचे तुकडे लावले आहेत. या उल्का चंद्र, मंगळ आणि अवकाशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून पृथ्वीवर पडल्या होत्या असे सांगण्यात येत आहे. या सर्व उल्का खडकांचे तुकडे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. कंपनीने असे घड्याळ बनवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. घड्याळाची खास झलक एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
हेही वाचा… ‘वय हा फक्त आकाडाच!” १०४ वर्षाच्या आजीने केलं स्काय डायव्हिंग; जागतिक विक्रम मोडण्याचा केला प्रयत्न
व्हिडीओ नक्की बघा :
१२ उल्का खडक (meteor rocks) लावलेलं खास घड्याळ :
घड्याळाला ‘कॉस्मोपॉलिस’ असे नाव देण्यात आले आहे. या घड्याळाची किंमत दोन कोटींहून अधिक आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सोशल मीडियावर या घड्याळाशी संबंधित एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे, ज्यामध्ये उल्का खडकांचे तुकडे दिसत आहेत. एकंदरीतच हे घड्याळ खूप खास आहे.
एका स्टँडवर तुम्हाला उल्का खडक ठेवलेले दिसतील आणि हे सर्व १२ खडक घड्याळामध्ये बसवण्यात आले आहेत. तसेच हे घड्याळ दिसायला खूपच अनोखं आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नेहमीच अनोख्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच आज १२ खडकांपासून तयार केलेलं खास घड्याळ कसे तयार करण्यात आले आहे याची एक खास झलक दाखवण्यात आली आहे, जी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियावर या घड्याळाचा व्हिडीओ @guinnessworldrecords यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स कमेंट करत आहेत आणि म्हणत आहेत की, ‘या घड्याळाने स्वतःमध्येचं एक विश्व तयार केलं आहे.’ तसेच काही जणांना उल्का खडकांपासून तयार करण्यात आलेलं हे घड्याळ त्यांच्या सोबत ठेवावेसे वाटते आहे, असे ते कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत.