आयुष्याचं ध्येय केवळ पैसा कमावणं नसतं आणि पैशातून आनंद विकत घेता येत नाही, असं अनेकदा म्हटलं जातं. तर काहीजण नेमकं याच्या विरुद्ध पैसा असेल तर आयुष्यात काहीही करता येतं असं म्हणतात. त्यामुळे आयुष्यात पैसाच सर्वस्व आहे की नाही? याबाबतचा वाद सतत सुरु असतो. परंतु या वादावर समाधानकारक असं उत्तर कोणाकडेच सापडतं नाही. कारण या मुद्यावर प्रत्येकाचे वेगवेगळे मत असते. शिवाय या मुद्यावरुन सोशल मीडियावर सतत चर्चा सुरु असते.

अशातच आता आणखी या चर्चेला उधाण आलं असून त्याला कारणीभूत ठरला आहे बंगळुरू येथील २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर. या २़ तरुणाने पैसा आणि एकाकीपणाशी संबंधित एक हृदयस्पर्शी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयुष्यात पैसा महत्वाचा आहे की नाही? या वादाला सुरुवात झाली आहे. या तरुणाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, मी वर्षाला ५८ लाख रुपये कमावतो तरीही मी एकाकीपणाचं उदास जीवन जगतोय.

हेही वाचा- “आईची माया…” मुलगा मिटींगमध्ये बिझी, काळजीपोटी आईने केला मेसेज; WhatsApp चॅटींगचा स्क्रीनशॉट पाहून नेटकरी भावूक

५८ लाखांच पॅकेज तरीही समाधानी नाही –

हेही पाहा- शिक्षकांनी सांगितलं क कबुतराचा अन् विद्यार्थ्यांने संपूर्ण बाराखडीच कबुतरावर लिहिली; नेटकरी म्हणाले, “टॅलेंट आहे पण…”

या तरुणाने आपल्या मनातील भावना सोशल मीडियावर शेअर करताना लिहिलं आहे, “मला माझं आयुष्य खूप कंटाळवाण वाटत आहे, मी FAANG कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे, मला २.९ वर्षांचा अनुभव असून मी वर्षाला ५८ लाख रुपये कमावतो, शिवाय मी माझे काम आरामात करतो. परंतु मी माझ्या आयुष्यात एकटाच आहे, माझ्याजवळ वेळ घालवण्यासाठी गर्लफ्रेंड नाही आणि माझे सर्व मित्र त्यांच्या आयुष्यात बिझी झाले आहेत. त्यामुळे माझे कामाचे जीवनही निराशाजनक बनले आहे, कारण मी सुरुवातीपासून एकाच कंपनीत आहे आणि दररोज त्याच कामात व्यस्त आहे. आता मी नवीन आव्हाने आणि संधींची अपेक्षा देखील करत नाही.”

तरुणाने नेटकऱ्यांकडून घेतला सल्ला –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या इंजिनीअरने लोकांना विचारल की, “कृपया मला माझे जीवन अधिक मनोरंजक बनवण्यासाठी मी काय करावे याबद्दल सल्ला द्या.” त्याच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. तर अनेकांनी त्याला वेगवेगळा सल्ला दिला आहे. अनेकांनी त्याच्या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “माझ्या काही मित्रांनी मला हिच समस्या सांगितली आणि अनेकदा मलाही एकटेपणा, कंटाळा आणि टेंन्शन येतं.” तर आणखी एकाने लिहिले, “हा खरा संघर्ष आहे.” दुसऱ्याने लिहिलं, “तो एकटा पडला आहे आणि माणसांच्या सहवासासाठी तळमळत आहे. शिवाय त्याला पगाराव्यतिरीक्त सर्व गोष्टी आवश्यक वाटत आहेत. एकाकीपणा हा आधुनिक जीवनाला लागलेला शाप आहे, मात्र आपण त्याला स्वीकारत नाही.” तर आणखी एकाने या तरुणाला सल्ला दिला आहे त्याने आपल्या कमेंटमध्ये लिहिलं आहे, “मला वाटतं गर्लफ्रेंड शोधणे हा समस्येचा उपाय नाही.” तर आणखी एका व्यक्तीने केवळं पैसा कमावणं म्हणजे आयुष्य नव्हे, असं लिहिलं आहे.