Python Attack Shocking Video : पावसाच्या दिवसांत जंगल परिसरात फिरताना फार काळजी घ्यावी लागते. कारण- अनेक धोकादायक प्राणी या काळात अन्नाच्या शोधात फिरत असतात. विशेषत: साप, अजगर अशा महाभयानक प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अशा प्रकारे मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एक जंगलात एक व्यक्ती नैसर्गिक विधीसाठी बसलेली होती. त्यावेळी तब्बल १३ फूट लांबीचा एक अजगर तिथे आला आणि त्याने त्याच्यावर हल्ला केला. त्या महाकाय अजगराने व्यक्तीच्या मानेसह संपूर्ण शरीराला विळखा घातला. धक्कादायक म्हणजे त्या व्यक्तीला चक्क गिळण्याचा प्रयत्न केला. काळजात धडकी भरविणाऱ्या या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.
अजगराचे तोंड घट्ट पकडून राहिला अन्… (Python Viral Video)
यावेळी अजगराने त्या व्यक्तीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; पण त्या व्यक्तीने अजगराचे तोंड घट्ट पकडून, त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी २० मिनिटे धडपड करूनही त्याला यश आले नाही. उलट अजगर त्या व्यक्तीभोवती आवळलेला फास आणखी घट्ट करीत होता. अखेर सुटका करून घेणे कठीण झाल्याने त्याने आरडाओरड केली.
अजगराचा व्हिडीओ पाहून युजर्स शॉक (Python Viral Video)
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अजगराच्या तावडीत सापडलेल्या त्या व्यक्तीने जीव वाचविण्यासाठी जोरजोरात आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक धावून आले. ते तेथे पोहोचताच त्यांना धक्का बसला. कारण- अजगराने त्या व्यक्तीला पूर्णपणे विळखा घातला होता. अजगराची पकड इतकी घट्ट होती की, त्या व्यक्तीला काही वेळाने श्वास घेतानाही त्रास होऊ लागला होता. पण नागरिकांनी अजगराला काठ्या, दांडक्याने मारहाण केली आणि अखेर त्या व्यक्तीची सुटका केली. लोक दोरी आणि काठीच्या साह्यानेही त्या व्यक्तीला सोडविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यावेळी एका व्यक्तीने अजगराला कुऱ्हाडीने घाव घालून ठार मारले, असे सांगितले. तसेच गावकऱ्यांनी अजगराला ठार मारून त्या व्यक्तीचा जीव वाचवला, असेही सांगण्यात येत आहे.
More Trending News Read Here : अजबच! घटस्फोटानंतर महिलेने ठेवली Divorce Party; डान्स करत केले जंगी सेलिब्रेशन: पाहा Video
बलपूरच्या कुंडम तहसीलच्या बगराजी गावातील कल्याणपूरमध्ये रविवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्काच बसला आहे.