scorecardresearch

Premium

Video : घरच्या घरी तयार करा रूम फ्रेशनर; मच्छरही राहतील दूर अन् सुंगधित होईल घर…

सोशल मिडियावरील व्हायरल व्हिडीओत एका युजरने घरच्या घरी रूम फ्रेशनर तयार केला आहे

A user has made a homemade room freshener from fruits
(सौजन्य:ट्विटर/@tansuyegen)Video : घरच्या घरी तयार करा रूम फ्रेशनर; मच्छरही राहतील दूर अन् सुंगधित होईल घर…

Viral Video : प्रत्येकाला स्वतःचं घर नीटनेटकं, सुंदर आणि स्वच्छ ठेवायला खूप आवडतं. यासाठी आपण नियमित घराची साफसफाई करत असतो, पण तरीसुद्धा अनेकदा घरामध्ये कुबट वास येतो. त्यामुळे हा वास दूर करण्यासाठी अनेकजण रूम फ्रेशनर, एयर पॉकेट, एयर स्प्रे किंवा सुगंधित अगरबत्ती आदी अनेक गोष्टींचा उपयोग करताना दिसून येतात; तर आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. एका युजरने फळांपासून घरच्या घरी रूम फ्रेशनर तयार केला आहे; जे पाहून तुम्हीसुद्धा चकित व्हाल.

तर युजरने संत्र आणि लिंबू या फळांपासून हा अनोखा रूम फ्रेशनर तयार केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, पहिल्यांदा संत्र या फळाचा सगळ्यात वरचा भाग कापून बाजूला ठेवला आहे आणि संत्र्याच्या मध्यभागी मेणबत्ती ठेवून दिली आहे. आणि मेणबत्तीच्या भोवती दालचिनी वर्तुळाकार लावून घेतली आहे आणि दोन मोठ्या टूथपिक फळामध्ये लावून संत्र्याचा कापलेला वरचा भाग त्यावर लावून घेतला आहे व मेणबत्ती पेटवण्यात आली आहे. नंतर लिंबू घेऊन त्याचासुद्धा वरचा भाग कापून बाजूला ठेवला आहे. लिंबाच्या अगदी मधोमध मेणबत्ती लावून त्याच्या भोवतीसुद्धा दालचिनी लावून दोन मोठ्या टूथपिक बसवल्या आणि लिंबाचा वरचा भाग त्यावर बसवून घेतला आहे. तसेच या दोन्ही रूम फ्रेशनरला एका टेबलवर नेऊन ठेवण्यात आले आहे. अशा हटके पद्धतीत घरच्या घरी लिंबू आणि संत्र्यापासून रूम फ्रेशनर तयार करण्यात आला आहे. फळांपासून रूमफ्रेशनर कसा तयार करण्यात आला आहे, एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.

ms dhoni appointment letter for ticket collectors job in indian railways goes viral
महेंद्रसिंग धोनीच्या पहिल्या सरकारी नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर होतंय व्हायरल; PHOTO पाहून चाहते म्हणाले, ‘व्वा…”
Turn any YouTube video convert into a GIF Just using Three Tools Know The Step By Step
तुमच्या आवडत्या युट्यूब व्हिडीओचे करा GIF मध्ये रूपांतर; फक्त ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो
IFS officer Parveen Kaswan collected 2 trucks of plastic with team
दोन ट्रक प्लास्टिक केले जमा! चक्क IFS अधिकाऱ्याने स्वच्छ केले जंगल, व्हिडीओ एकदा पाहाच
The bride painted a love story on the wedding shawl; Watch Navradeva's reaction once Video Viral
भारीच की! नवरीने लग्नाच्या शालूवर कोरली लव्हस्टोरी; नवरदेवाची रिएक्शन एकदा पाहाच, Video Viral

हेही वाचा…VIDEO: मुंबईचा राजा यंदा ‘रायगडा’वर विराजमान होणार; पाहा गणेश गल्लीत कसा उभारला जातोय महाराजांचा किल्ला

व्हिडीओ नक्की बघा :

घरच्या घरी तयार केला रूमफ्रेशनर :

तुम्हाला बाजारात रूम फ्रेशनर, एअर फ्रेशनर सहज मिळतो, पण सुगंध येण्यासाठी यात अनेक रसायनांचा वापर केला जातो; तसेच हे महागसुद्धा असतात आणि म्हणूनच आपल्यातील अनेक जण बाजारात मिळणारे रूम फ्रेशनर विकत घेत नाहीत; त्यामुळे घर सुगंधित ठेवण्यासाठी काही जण घरगुती वस्तूंचा उपयोग करून काहीतरी जुगाड करताना दिसतात. तसंच काहीसं या व्हिडिओतसुद्धा बघायला मिळालं आहे आणि फळांपासून हा अनोखा रूम फ्रेशनर तयार करण्यात आला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ @tansuyegen यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करून लिहिले की, ग्रेट! यामुळे घराला चांगला वास येईल आणि माश्या, डाससुद्धा दूर राहतील, असे व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे. तसेच व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांना ही कल्पना आवडली असून अनेक जण विविध शब्दांत युजरच्या रचनेचं कौतुक करताना दिसून आले आहेत. तसेच काही जण फळांपासून तयार केलेली ही वस्तू पाहून, ‘कीटक निरोधक आणि एअर फ्रेशनर या दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र बनवल्या’, ‘खूप छान कल्पना आहे’, ‘आम्हीसुद्धा नक्की घरी बनवून बघू’ अशा विविध कमेंट करताना दिसून आले आहेत

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A user has made a homemade room freshener from fruits asp

First published on: 11-09-2023 at 18:46 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×