सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या लाखो व्हिडीओमध्ये एखादाच व्हिडिओ असा असतो जो नेटकऱ्यांना भावतो, त्यांच्या काळजाला भिडतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक हरण आपल्या पाडसाला संकटातून वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालत असल्याच दिसून येत आहे.

आई ही आई असते, मग ती माणसांची असो वा प्राण्याची, जेव्हा आपल्या मुलांवर काही संकट येतं, त्यावेळी आई कोणताही विचार न करता त्यांच्या मदतीला धावून जाते. म्हणूनच आईला जगातील सर्वात मोठ्या योद्ध्याची उपमा देण्यात येते. अशाच एका हरणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही तिच्या मातृत्वातील गोडवा जाणवल्याशिवाय राहणार नाही.

हेही पाहा- “मांजरीची पिल्लं दत्तक घ्या आणि मोफत विमान प्रवास करा”; ‘या’ कंपनीची ऑफर होतेय व्हायरल

हरिणी आणि तिच्या पाडसाचा हा व्हिडीओ व्हायरल हॉग या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक हरिण आपल्या नुकत्याच जन्माला आलेल्या पाडसाचे रक्षण करताना दिसत आहे. हे पाडस नुकतेच जन्माला आल्यामुळे त्याला व्यवस्थित चालता येत नसल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हे पाडस सुरुवातीला एकटेच रस्त्यावर दिसत आहे. त्या रस्त्यावरुन जाणाऱ्या कारमधील एक व्यक्ती हरणाचे पाडस दिसताच गाडी थांबवून त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करायला सुरुवात करतो.

हेही पाहा- मेडिकलमध्ये ORS घ्यायला गेलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारा Video व्हायरल

View this post on Instagram

A post shared by ViralHog (@viralhog)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, ज्यावेळी कारच्या लाईट चालू होतात आणि ते हरणाचे पाडस खाली पडते आणि त्यावेळी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाच्या आड असणारी पाडसाची आई बाहेर येते आणि त्या पाडसाला आधार देत रस्त्याच्या पलिकडे घेऊन जाते. खरतंर हरण हा खूप भित्रा प्राणी आहे. त्यामुळे गाडीची लाईट दिसल्यावर तिथे इतर कोणतंही हरण आलं नाही. पण या पाडसाची आई मात्र कसलाही विचार न करता त्याला घेऊन जाण्यासाठी आली. त्यामुळे प्राण्यांची असो वा माणसांची आई ही आई असते असं नेटकरी म्हणत आहेत.