सोशल मीडियावर अनेक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे पाहिल्यानंतर आपणाला हसू कंट्रोल करता येत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक कुत्रा मुली डान्स करत असणाऱ्या स्टेजवर जाऊन डान्स पाहात उभा राहिल्याचं दिसत आहे. कुत्र्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे पाहून आपणालाही कुत्र्यांचं कौतुक करावंस वाटतं. सध्या असाच एक कुत्रा दोन मुली डान्स करत असतानाच कुत्रा स्टेजवर गेल्याचं दिसत आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष नाचणाऱ्या मुलींपेक्षा कृत्याच्या हालचालींवर जास्त असल्याचं दिसत आहे.

डान्स पाहण्यासाठी कुत्रा स्टेजवर चढला

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ डॉग इन्फॉर्मेशन केरळ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटने शेअर केला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पण व्हिडिओमध्ये दिसणारा कुत्रा स्टेजवर बिनधास्तपणे जातो आणि मुलींचा डान्स पाहत उभा राहिल्याचं दिसत आहे. दरम्यान काही वेळाने एक व्यक्ती स्टेजवर येते आणि त्या कुत्र्याला पकडू नेत असल्याचंही दिसत आहे. तर स्टेजवर चढून मुलींचा डान्स पाहणाऱ्या कुत्र्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा- धक्कादायक: शेजाऱ्याचा बदला घेण्यासाठी रागारागत मारल्या ११०० कोंबड्या; आता मारतोय कोर्टात चकरा

हेही पाहा – बायको फूल देत म्हणाली ‘I Love You’; आजोबांनी दिलं जबरदस्त उत्तर, Video पाहिल्यानंतर पोट धरुन हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी लाइक केला आहे, तर अनेकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने हा कुत्रा डान्स प्रेमी असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने कुत्र्याच्या धाडसाचं कौतुक करायला पाहिजे असं लिहिलं आहे. त्यामुळे स्टेजवर जाऊन डान्स पाहणारा कुत्रा अनेकांना आवडल्याचं दिसत आहे.