scorecardresearch

एकाचवेळी २ सायकल पळवणाऱ्या व्यक्तीचा Video व्हायरल, अनोखा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल थक्क

व्हिडीओतील व्यक्तीचे सायकल चालवण्याचे अनोखे टॅलेंट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

man stunting on road
सोशल मीडियावर सध्या एका सायकलस्वाराचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Photo : Instagram)

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ असे असतात जे आपणाला थक्क करतात. सध्या जगभरातील अनेक लोकांना आपले टॅलेंट दाखवण्यासाठी सोशल मीडियासारखा जबरदस्त प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यामुळे प्रत्येकजण काहींना काही अनोखा स्टंट किंवा कलाकृती या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. यातील काही लोकांचे टॅलेंट पाहून आपणाला त्यांचे कौतुक करावे वाटतं शिवाय त्यांच्या व्हिडीओमुळे आपलं मनोरंजन देखील होतं.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने एकावेळी दोन सायकल चालवण्याचा अनोखा पराक्रम करुन दाखवला आहे. सोशल मीडियावर आपण अनेकदा कोणाला भन्नाट डान्स करताना तर कोणाला अनोखा जुगाड करताना आपण पाहिलं आहे. त्यामुळे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करणारे अनेक लोक सोशल मीडियावर व्हायरल होतात हे सर्वांना माहिती आहे.

हेही पाहा- Video: जीत का समंदर चुनौतियोंसे भरा है, देशाच्या रक्षणासाठी जवान बर्फाच्या वादळात तैनात

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील व्यक्तीनेदेखील त्याच्या अनोख्या टॅलेंटमुळे नेटकऱ्यांना आकर्षित केलं आहे. ज्यामुळे तो प्रचंड व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओतील व्यक्ती आपलं अनोख टॅलेंट दाखवताना दिसत आहे. हा व्यक्ती एकाचवेळी दोन सायकल चालवताना दिसत आहे. अनेकांना एक सायकल चालवताना किती काळजी घ्यावी लागते आपणाला माहिती आहे. शिवाय रहदारीच्या रस्त्यावर सायकल काळजीपुर्वक आणि हळू चालवावी लागते, अन्यथा दुर्घटना होण्याची शक्यता असते. पण या व्हिडीओतील व्यक्ती एकाच वेळी दोन सायकल आणि त्याही भरधाव वेगाने पळवतानाही दिसत आहे. त्यामुळे या व्यक्तीची सायकल चालवण्याची कला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेही पाहा- Video viral: प्रवाशांची गर्दी, AC लोकलचा दरवाजा उघडाच? पाहा काय घडलं

नेटकऱ्यांना आवडला व्हिडीओ –

व्हिडीओतील माणसाला एकाच वेळी दोन सायकल चालवताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर अनेकजण त्या व्यक्तीच्या टॅलेंटचं कौतुकदेखील करत आहेत. अनिल नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडल्याचं दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्राया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यांने लिहिलं की, “आपल्या देशात टॅलेंटची कमतरता नाही.” तर आणखी एकाने लिहिले की, “हे टॅलेंट भारताबाहेर जाऊ देऊ नका.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 10:49 IST

संबंधित बातम्या