Premium

Video: वाहन चालकांना शिवीगाळ, कारच्या बोनेटवर डान्स; प्रेमात फसवणूक झाली म्हणून तरुणीचा भररस्त्यात राडा

मुलीच्या गैरवर्तनुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

shocking girls viral video
आजकाल सोशल मीडियावर अनेक मुला-मुलींचे रस्त्यावर गैरवर्तन करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. (Photo : Twitter)

आजकाल सोशल मीडियावर अनेक मुला-मुलींनी रस्त्यावर गैरवर्तन केल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी कोणी गाडीच्या छतावर बसून दारु पिताना तर कधी गाडीवर डान्स करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी भररस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहे. ती मुलगी चक्क कारवर उभी राहून नाचतानाही दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ग्वाल्हेरच्या फूलबाग चौक येथील आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीने रस्त्यावरील वाहनचालकांना शिवीगाळ करत त्यांच्याकडील स्कूटी हिसकावण्याचा प्रयत्न केला. इतकच नव्हे तर तिने कार चालकाला मारहाण केल्याचंही सांगण्यात येत आहे. या तरुणीला असं कृत्य करण्यापासून अनेकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ते मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन गेले.

प्रेमात धोका म्हणून रस्त्यावर धिंगाना –

हेही पाहा- बाप तो बापच! मुलाशी वाद झाल्यानंतर वडिलांनी WhatsApp ला ठेवला जबरदस्त स्टेटस, वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल

हेही पाहा- Pakistani Elon Musk: पाकिस्तानमध्ये फळ खरेदी करताना दिसला एलॉन मस्क! हा व्हायरल फोटो पाहिलात का?

मुलीने आपली प्रेमात फसवणूक झाल्यामुळे हे सर्व कृत्य केल्याचं ती लोकांना सांगत होती, असंही स्थानिकांडून सांगण्यात येत आहे. @SushilKaushikMP नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘ग्वाल्हेरमधील मुलीचा हाय व्होल्टेज ड्रामा. फुलबाग चौकात एका मुलीने गोंधळ घातला. तरुणीने तासभर गोंधळ घातला तिने एका कार चालकाला मारहाण केली. वयस्कर व्यक्तीची स्कूटी हिसकावून घेतली आणि ती स्वत: चालवू लागली. तरुणीने पोलिसांचे बॅरिकेड्स रस्त्यावर फेकले.’

सध्या या मुलीच्या गैरवर्तनुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी ती तरुणी दारूच्या नशेत होती का? असा प्रश्न विचारला आहे. तर काहींनी ती मानसिक रोगी असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान, अद्याप या प्रकरणाबाबतची फारशी माहिती मिळालेली नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A video of a young woman dancing on a car because she was cheated in love has gone viral jap