कोणाचं नशीब कधी आणि कसं पालटून जाईल हे सांगता येत नाही. सध्या एका महिलेचं नशीब असंच पालटलं असून ती एका रात्रीत करोडपती झाली आहे. शिवाय ती करोडपती होण्यास देवी लक्ष्मी कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे. हो कारण या महिलेला झोपेत लक्ष्मीचे स्वप्न पडते यावेळी देवी तिला काहीतरी सांगते. देवीने स्वप्नात सांगितलेले शब्द आठवणीत ठेवत ही महिला दुसर्या दिवशी बाजारात जाते आणि काही वेळाने जेव्हा ती घरी परतते तेव्हा ती पाच कोटींहून अधिक रुपयांंची मालकीण झालेली असते. या महिलेला मिळालेले पैसे पाहून तिच्या कुटुंबीयदेखील आश्चर्यचकीत झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया येथील आहे. तेथील एका महिलेला रात्री झोपेक एर स्वप्न पडले. ती स्वप्नात श्रीमंत होते, शिवाय आपण स्वप्नात लक्ष्मीला प्रत्यक्ष पाहतो आणि ती आपणाला एक नंबर सांगते असा दावा महिलेने केला आहे. शिवाय देवीने स्वप्नात दिलेला नंबर तिला दुसऱ्या दिवशी आठवतो. मग ती सकाळी बाजारात जाते आणि त्याच नंबरचे लॉटरीचे तिकीट खरेदी करते. त्यानंतर ती तब्बल सहा लाख ७० हजार डॉलर्सपेक्षा जास्त रक्कमेची लॉटरी जिंकते. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम सुमारे पाच कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. याबाबतचे वृत्त न्यूज18 हिंदीने दिलं आहे.
UPI.com वेबसाइटनुसार, अल्टोमा असे या महिलेचे नाव आहे. तिने १२ एप्रिल रोजी लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. दोन दिवसांनी त्या तिकिटाचा ड्रॉ निघाला. ही महिला काही दिवसांपासून दूर होती आणि ती परत आल्यावर तिने तिचे बँक खाते तपासले. त्यात सुमारे साडेपाच कोटी रुपये जमा झाले होते. एवढी मोठी रक्कम लॉटरीत जिंकल्यानंतर, ती महिला सांगते की, तिला स्वप्नात एक नंबर सांगितला गेला होता. तोच नंबर तिने लॉटो लॉटरीची तिकिटे खरेदी करण्यासाठी वापरला. आता या महिलेचे म्हणणे आहे की तिने अद्याप या पैशाचे काय करायचे हे ठरवले नाही. पण, या पैशामुळे जीवन सुकर होणार यात शंका नाही.