Viral Video : अनेक जण घरी गायी, म्हशी पाळतात. अनेक लोकं गायी म्हशीचे व्हिडीओ सोशल मीडियावर आवडीने शेअर असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका म्हशीने पिल्लाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या म्हशीची प्रसुती एका शेतकरी तरुणीने केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हालाa young girl help to deliver buffalo giving birth of calf video goes viral दिसेल की एक म्हैस पिल्लांना जन्म देत आहे आणि एक तरुणी म्हशीच्या पिल्लाला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल तरुणीच्या मदतीने म्हैस एका गोंडस पिल्लाला जन्म देते. म्हैस जेव्हा पिल्लाला जन्म देते तेव्हा तिच्या पिल्लाला बाहेर ओढावं लागतं. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की म्हशीची प्रसुती करणे किती कठीण आहे.

हेही वाचा : VIDEO : भारत वर्ल्डकप फायनल का हरला? तरुणाने दिले मजेशीर उत्तर, व्हिडीओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

aamhi_shetkari या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आम्ही शेतकरी”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वाघीन शोभली शेतकऱ्याची” तर एका युजरने लिहिलेय, “हीच खरी शेतकऱ्याची वाघीन” आणखी एका युजरने लिहिलेय, “मानलं पाहिजे तुम्हाला”