Viral Photo : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हीही डोकं धराल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या एका तरुणाने असा रेज्युमे बनवला आहे की पाहून कोणीही अवाक् होईल. नोकरीसाठी लोक वाट्टेल ते करतात पण या तरुणाने जे केले त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. त्याने नेमके काय केले, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हायरल फोटो पाहावा लागेल.

या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला एका तरुणाचा रेज्युमे दिसेल. पण हा रेज्युमे अर्धा प्रिंट केलेला आहे. म्हणजेच रेज्युमेमध्ये पूर्ण माहिती दिसत नाही आणि त्या खाली लिहिलेय, ““हायर मी टू अनलॉक माय फुल पोटेंशियल!” म्हणजेच मी कार्यक्षमता जाणून घेण्यासाठी मला नोकरी द्या” सध्या हा रेज्युमे चर्चेचा विषय ठरला आहे.
तुम्ही आजवर रंगबेरंगी ग्राफिक्स आणि डिझाइनचा वापर करून तयार केलेले अनेक रेज्युमे पाहिले असेल पण या तरुणाने बनवलेला असा रेज्युमे कदाचित पहिल्यांदाच पाहिला असेल. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल फोटो (Viral Photo)

omg.kklk या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझा रेज्युमे सबस्क्राइब करा” तर एका युजरने लिहिलेय, “वाह मला ही कल्पना आवडली.” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझ्या सीव्हीमध्ये मी हाच टेम्प्लेट वापरला आहे” एक युजर लिहितो, “भाऊ तू खरंच हुशार आहे, मला पटलं” तर एक युजर लिहितो, “याला म्हणतात क्रिएटिव्हीटी” एक आणखी युजर लिहितो, “याला म्हणतात क्लिकबेट रेज्युमे”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक युजर्सनी या फोटोवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी असे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. लोक अनेक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची क्रिएटिव्हीटी दाखवत असतात. काही दिवसांपूर्वी असाच एक लग्नाच्या कार्डचा फोटो व्हायरल झाला होता. ते लग्नाचे कार्ड चक्क व्हॉट्सअप चॅटच्या स्वरूपात छापले होते.