Viral Video : अनेक जण सोशल मीडियावर त्यांच्या आवडीप्रमाणे रिल किंवा व्हिडीओ शेअर करताना दिसतात. पण अनेक जण रील बनवण्याच्या नादात वाट्टेल ते करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण चालत्या दुचाकीवर रील बनवताना दिसत आहे. रीलच्या नादात त्याने वाहतूक नियम सुद्धा मोडले. शेवटी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

दिल्ली पोलिसांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक तरुण बाईक चालवताना दिसत आहे. त्याने हेल्मेट सुद्धा घातलेले नाही. तो रस्त्याने चुकीच्या बाजूने दुचाकी चालवताना दिसतो. रील बनवण्याच्या नादात त्याने वाहतूक नियम मोडले. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. पण या तरुणाला दिल्ली पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आणि त्याच्या दुचाकी आणि फोन जप्त केला आणि एवढंच काय तर दिल्ली पोलीस आता या तरुणाचे इन्स्टाग्राम अकाउंट बंद करणार आहेत.

हेही वाचा : लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”

दिल्ली पोलिसांनी त्यांच्या @DelhiPolice या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वाहतूक नियमांचे उल्लंघन करत रील बनवणाऱ्या विरोधात दिल्ली पोलिसांनी केली कारवाई.वाहतूक नियम कायद्याच्या विविध कलमांतर्गत चलन
दुचाकी आणि मोबाईल फोन जप्त केले. इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान काम केले दिल्ली पोलिसांनी” तर एका युजरने लिहिलेय, “अशीच कारवाई झाली पाहिजे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “दिल्ली पोलीस आपले खूप खूप आभार.” अनेक युजर्सनी दिल्ली पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. असे रील बनवणाऱ्या लोकांवर अशीच कारवाई पोलिसांनी करावी, असे अनेक युजर्स म्हणाले आहेत.