बाजारात एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर ती कागदी किंवा प्लास्टिकच्या पिशवीतून आपल्याला पॅक करून देण्यात येते. या पिशव्या आपण घरी आल्यानंतर जपून ठेवतो आणि पुढच्या वेळेस बाजारात जाताना किंवा घरी सामान ठेवण्यासाठी या पिशव्यांच्या उपयोग करतो. पण, आज व्हायरल पोस्टमध्ये एका तरुणाने अगदीच हटके जुगाड केला आहे आणि डोक्यावर कागदी पिशवीला हेल्मेटसारखं लावून घेतलं आहे.

व्हायरल फोटो बंगळुरूचा आहे. दोन तरुण दुचाकीवर बसले आहेत; तर दुचाकी चालवणाऱ्यानं तर हेल्मेट घातलं आहे. पण, मागे बसणाऱ्यानं तरुणाकडे हेल्मेट नसतं. त्यामुळे तो एक हटके जुगाड करतो. तरुण एक कागदी पिशवी घेऊन, ती आपल्या डोक्यावर हेल्मेटप्रमाणे लावून घेतो; जे बघायला अगदीच मजेशीर आहे. तरुणानं कशा प्रकारे पिशवीचं हेल्मेट तयार करून घातलं आहे एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघा.

हेही वाचा…पुणेकरांचा नाद करायचा नाही! गाडीवर जागा कमी पडल्यामुळे तरुणीने चक्क डोक्यावर आणला आकाश कंदील, पाहा VIDEO

पोस्ट नक्की बघा :

कागदी पिशवीचं केलं हेल्मेटमध्ये रूपांतर :

बंगळुरूच्या अनोख्या गोष्टी सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत असतात. हेलिकॉप्टरमुळे ट्रॅफिक जाम, एक दिवसात भाड्यानं घर मिळणं, दिव्यांग तरुणीची घर शोधण्यासाठी धडपड, ढोलकीवर क्यूआर कोड लावणं आदी अनेक गोष्टी खूपदा व्हायरल होत असतात. अशातच आज पुन्हा एकदा बंगळुरूच्या एका रहिवाशानं हटके जुगाड करून कागदी पिशवीचं हेल्मेटमध्ये रूपांतर केलं आहे आणि अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्त्यावर सिग्नल लागलेला असतो, तेव्हा हे दोन तरुण दुचाकीवर बसलेले असतात आणि मागे बसलेल्या तरुणानं हे कागदी पिशवीचं हेल्मेट घातलेलं असतं. तेव्हा तिथे उपस्थित एका अज्ञात व्यक्तीनं या कागदी पिशवीचं हेल्मेट घातलेल्या तरुणाचा फोटो काढून घेतला. सोशल मीडियावर ही पोस्ट @3rdeyedude या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. अनेक जण ही पोस्ट ‘मार्केटमध्ये नवीन हेल्मेट आलं आहे’ अशा अनेक मजेशीर कमेंट्स फोटोखाली दिसून आल्या आहेत.