Anand Mahindra Tweet: भारतातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा(Anand Mahindra) हे त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते दररोज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून खूप पोस्ट करताना दिसतात. कधी देशातील गंभीर समस्या आपल्या माध्यमातून मांडतात तर कधी एखादा व्हिडीओ शेअर करत त्याची गोष्ट सांगताना दिसतात. आताही त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी मजेशीर आणि नाविन्यपूर्ण आहे.

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे

आनंद महिंद्रा यांनी एका जुन्या स्कुटरचा व्हिडीओ शेअर केला आहे. टाकाऊपासून टिकाऊ या क्लुप्तीप्रमाणे बांधकाम साइटवर जुन्या स्कूटरचा वापर केला जात आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, या जुनाट स्कूटरचा वापर करुन सिमेंटच्या गोणी चौथ्या मजल्यावर कशाप्रकारे पोहोचवल्या जात आहेत. या स्कूटरच्या मागच्या चाकाजवळ एक रस्सी बांधली आहे. एकदा एक्सलेटर दिल्यानंतर स्कुटरच्या मागचं चाक फिरत आणि रस्सी गुंडाळत जाऊन गोणी वरपर्यंत पोहोचते. हा व्हिडीओ पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा देखील थक्क झाले आहेत.

( हे ही वाचा: Video: लग्नात बुरखा घातलेल्या ‘ती’ ने सर्वांसमोर नवरदेवाला जवळ खेचंल; त्यानंतर त्याने महिलेचा चेहरा पाहिला अन…)

आनंद महिंद्रा यांनी ट्वीट मध्ये लिहिले की…

आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर करत ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ‘मला वाटतं यासाठी आम्ही यांना ‘पॉवर ट्रेन’ असं म्हणतो. वाहन इंजिनाच्या पॉवरचा वापर करण्याच्या अनेक पद्धती आहेत. ई स्कूटरसोबत हे आणखी सोपं होईल. ई स्कूटरची प्रोडक्शन कॉस्ट कमी झाली किंवा सेकंड हँड उपलब्ध झाल्या की सांगायला नको.’ हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर हजारो जणांनी पाहिला आहे.

( हे ही वाचा: लग्नात ‘डिजिटल शगुन’ ची भन्नाट कल्पना! रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेला Video एकदा पाहाच)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर युजर्स आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जणांनी तर या देसी जुगाडला किती खर्च आला असेल याबाबतही सांगितलं आहे. एका वापरकर्त्याने लिहिलं आहे की, ‘स्कूटर बाजारात दोन ते चार हजार रुपयात विकल्या जातात.’ दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, ‘आम्ही भारतीय वाहनांचा योग्य पद्धतीने वापर करतो. कामं सोपं करण्यास आम्ही हुशार आहोत.’