Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सोशल मीडियावर कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी भांडताना दिसतात, कधी कोणी हटके जुगाड सांगताना दिसतात तर कधी अंगावर काटा आणणारे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एक थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डिलीव्हरी बॉय Harley Davidson दुचाकी चालवताना दिसत आहे.
तुम्ही अनेकदा डिलीव्हरी बॉयला बघितले असेल. अनेकदा तो स्वस्त दुचाकी, किंवा सेकंड हँड दुचाकी किंवा स्कुटी चालवताना दिसतो. पण तुम्ही कधी डिलीव्हरी बॉयला Harley Davidson चालवताना पाहिले का? या व्हिडीओमध्ये एक डिलीव्हरी Harley Davidson चालवताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

हेही वाचा : तुझ्या जिद्दीला सलाम! दोन्ही हात नसणारी तरुणी इतरांच्या हातावर काढतेय सुंदर मेहेंदी, VIDEO एकदा पाहाच

हा व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. या व्हिडीओमझ्ये एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय दुचाकी चालवताना दिसत आहे. हा डिलिव्हरी बॉय त्याच्या दुचाकीमुळे सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्याकडे Harley Davidson आहे आणि तो Harley Davidson चालवताना दिसतोय. त्याच्या मागे एक झोमॅटो बॅग सुद्धा दिसत आहे. डिलिव्हरी बॉयजवळ इतकी महागडी दुचाकी पाहून कोणीही अवाक् होईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा जीवघेणा खेळ; प्रवाशाचा तोल गेला अन्…. CCTV मध्ये कैद झाली घटना

_call_me_ashu16 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “Harley Davidson चालवताना डिलीव्हरी बॉय” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिलेय, “भारतात इएमआयवर अनेक महागड्या वस्तू खरेदी करतात.” तर एका युजरने लिहिलेय, “पाच हजारचे हेल्मेट, ३४०० रुपयांचे ग्लोव्स, तीन लाखांची दुचाकी आणि झॉमॅटो बॉय? हे काय दाखवत आहात?” आणखी एका युजरने लिहिलेय, “त्याने मेहनत केली आणि त्याला पाहिजे ती दुचाकी घेतली.”