Viral Video : असं म्हणतात, जिद्द असली की कोणतीच गोष्ट अशक्य नाही. अनेकदा आपण एखादी गोष्ट न करण्याचे हजार कारणे सांगतो पण एखादी गोष्ट पुर्णत्वास नेण्यासाठी फक्त एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे जिद्द. सोशल मीडियावर असे अनेक प्रेरणादायी व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो तर काही व्हिडीओ भारावून टाकणारे असतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी खूप सुंदर मेहेंदी काढताना दिसत आहे. या तरुणाला दोन्ही हात नाही तरी ती हाताच्या कोपरच्या मदतीने सुंदर मेहेंदी काढताना दिसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अनेकांना प्रेरित करणारा हा व्हिडीओ आहे.

व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की दोन्ही हात नसलेल्या एका तरुणीने मेहेंदी काढण्याचा स्टॉल लावला आहे. ही तरुणी तिच्या हाताच्या कोपरनी एका महिलेच्या हातावर सुंदर मेहेंदी काढताना दिसत आहे. ती खूप सुंदर डिझाइन काढताना दिसते. तरुणीची जिद्द पाहून कोणीही तिचे चाहता होईल. या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलचा व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : आज फिर जीने की तमन्ना हैं.., विश्वास नांगरे पाटलांनी लुटला पोहण्याचा आनंद; सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

shubham_mehndi_artist_lucknow या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मला तिचे नाव माहीत नाही पण या मेहेंदी कलाकाराची कितीही स्तुती केली तरी कमी आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता…देव तिलाआशीर्वाद देवो”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या मुलीच्या मेहनतीला सलाम” तर एका युजरने लिहिलेय, “अपंग शरीराने असतात विचाराने नाही. ताई तुला सलाम” आणखी एका युजरने लिहिलेय, “आत्मविश्वास असला की सर्व काही शक्य आहे” अनेक युजर्सनी या तरुणीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही लोकांनी हार्टचे इमोजी शअर केले आहेत.

Story img Loader