आयुष्यात आपण अनेक लहान-मोठ्या गोष्टींसाठी तक्रार करत असतो, मात्र काही गोष्टी खऱ्या अर्थाने आपले डोळे उघडतात. अशाच आशयाचा एक व्हिडिओ महिंद्रा समूहाचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी नुकताच आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. भावूक करणारा हा व्हिड़िओ पाहताना आपल्या डोळ्याच्या कडा पाणावल्याशिवाय राहत नाही. आता या व्हिडिओमध्ये असे काय आहे ज्यामुळे आनंद महिंद्रा इतके भावूक झाले असावेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडिओ परदेशातील असून एक लहान मुलगा आणि मुलगी बागेत घसरगुंडी खेळत असल्याचे यामध्ये दिसते. दोन्ही हात आणि पाय नसलेला मुलागा अतिशय शिताफीने घसरगुंडीच्या पायऱ्या चढत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. हृदय हेलावून टाकणारा हा व्हिडिओ पाहताना सुरुवातीला आपल्याला त्रास होतो. मात्र त्याच्या पुढे जात आनंद महिंद्रा याविषयी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ”सुरुवातीला मी हे दृश्य पाहू शकलो नाही. पण नंतर मी स्वतःला सावरले. कोणतेही काम कठिण असते अशी तक्रार मी यापुढे कधी करेन असे मला वाटत नाही.”

Video : या रेस्तराँमध्ये चेहरा दाखवून पैसे भरा आणि काय हवं ते बिनधास्त खा

व्हिडिओतील या लहान मुलाला पाहून आपल्यालाही त्याचे कौतुक वाटेल. त्याच्या चेहऱ्यावरील भावही आपल्याला विचार करायला भाग पाडतील. त्याची पायऱ्या चढण्याची जिद्द आपल्याला अगदी सहज समजते. विशेष म्हणजे आपल्या मुलामध्ये आत्मविश्वास यावा यासाठी त्या मुलाची आई प्रयत्न करत असल्याचे दिसते. त्यामुळे ती एकदाही त्याला स्वतःहून मदत करण्यास जात नाही, तर तुला मदतीची गरज आहे इतकेच विचारते. त्यावर तो मुलगा नाही म्हणतो आणि स्वतः आपल्या प्रयत्नांनी घसरगुंडीच्या पायऱ्या यशस्वीपणे चढतो. त्याच्या बाजूलाच त्याची बहीणही घसरगुंडी खेळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

आनंद महिंद्रा बऱ्याचदा विविध विषयांवरील गोष्टी ट्विट करत असल्याने सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्याचे आपल्याला दिसते. महिंद्रांच्या या ट्विटवर प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही रिट्विट केले असून हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. या मुलाच्या आईने त्याला दिलेले प्रोत्साहन तुम्ही मीस करु नका असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आनंद महिंद्रांचे हे ट्विट एका दिवसात १४ हजार जणांनी रिट्विट केले असून २२ हजार जणांनी त्याला लाईक केले आहे. याशिवाय ११०० जणांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत. यामध्ये त्या आईच्या पालकत्वाचे कौतुक अनेकांनी केले आहे. तर आपण खरंच किती भाग्यवान आहोत असेही काहींनी म्हटले आहे.

‘स्पॅम कॉल’ टाळून तुम्ही वाचवू शकता कोट्यवधी रुपये

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aanand mahindra inspiring tweet of child amitabh bacchan also retweeted it
First published on: 12-09-2017 at 12:54 IST