Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक दिल्लीतील लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. यामध्ये महामार्गावर चक्क २५ पेक्षा जास्त वाहनं एका मागोमाग धडाधड धडकली आहेत.

हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.

धुक्याचा परिणाम हायवेनं वाहन चालवणाऱ्या चालकांनाही मोठ्या प्रमाणात याचा सामना करावा लागत आहे. त्यातच सध्या दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवर धुक्यामुळे सुमारे २५हून अधिक वाहने एकमेकांवर आदळली आहेत.सुदैवाने या घडलेल्या अपघातात जीवित हानी झाली नाही मात्र झालेल्या अपघातामुळे घटनास्थळी बराच वेळ जाम होता. झालं असं की आज (बुधवारी) सकाळी दाट धुक्यामुळे गाझियाबादमधील दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर वाहने एकमेकांवर आदळल्याने अनेक लोक जखमी झाले आहे. या धडकेमुळे दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दाट धुक्यामुळे अपघातग्रस्त वाहने एक्स्प्रेसवेवर दिसत आहेत ज्यामुळे वाहतूक कोंडी होते. यावेळी हायवेवर आरडा-ओरडा ऐकायला येत आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @PressSubodhJain नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.