accident viral video: भारतासह जगात दररोज रस्त्यांवर शेकडो अपघात होत असतात. यातील काही अपघात नकळत घडतात, तर काही अपघातांना वाहनचालकच जबाबदार असतात. रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना सगळीकडे लक्ष असणं गरजेचं आहे. कारण इथे कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे. अनेकदा लोकांची स्वत:ची चुक नसताना दुसऱ्यांच्या चुकीमुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. तसेच अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे.सोशल मीडियावर आपल्याला या संबंधीत काही असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपल्यासमोर उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या असाच एक रस्ता अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे जो, पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

बस वेगात असतानाच ब्रेक झाला फेल –

हरियाणाच्या कैथल जिल्ह्यात बसचा ब्रेक फेल झाल्याने एक भीषण अपघात झाला. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने यावेळी मोठा दुर्घटना टळली आणि अनेक प्रवाशांचा जीव वाचला. चालकाने बस रोखण्यासाठी चौकातील बांधकामावर बस नेऊन आदळली. यामुळे बस जागीच रोखली गेली आणि मोठा अनर्थ टळला. मात्र बसचा अचानक ब्रेक दाबल्याने प्रवासी बसच्या बाहेर फेकले गेले. या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – एकाच कुटुंबातील ८ जण अडकले लिफ्टमध्ये; २ तास झाले तरी सुटका नाही, अन् तेवढ्यात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आपघातात काही प्रवासी बसच्या बाहेर फेकले गेल्यामुळे जखमी झाले, मात्र सुदैवानं या अपघातात कोणाचाही जीव गेला नाही. अपघातानंतर गर्दी केलेल्या लोकांनी ताबडतोब सर्व प्रवाशांना खाली उतरवलं. यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं. यावेळी प्रवाशांनी चालकानं दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक करत त्याचे आभार मानले आहेत.