सध्याच्या काळात सार्वजनिक उद्यान व्यायाम करण्यासाठी एक मुख्य स्थान ठरते आहे. पर्यटन स्थळे आणि आपल्या परिसरातील उद्यानात आपल्याला अनेकदा व्यायामाची सुविधा करण्यात आलेली दिसते. उद्यानांना नवं रूप देऊन त्यात विविध व्यायाम उपकरणांची साधने बसवण्यात आली आहेत. सकाळी किंवा संध्याकाळी अनेक जण उद्यानात जातात आणि मोकळ्या हवेत व्यायाम करण्याचा लाभ घेतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. उद्यानात एक आजोबा व्यायाम करताना आनंद लुटताना दिसत आहेत.
उद्यानातील या व्यायाम उपकरणांचा लहान मुलं मजा-मस्ती, तर मोठी मंडळी व्यायामासाठी याचा उपयोग करतात. तर आज एक आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आजोबा टीशर्ट, शॉट्स आणि पायात शूज घालून व्यायाम करण्यासाठी आले आहेत. आजोबा दोन रेलिंगच्या अगदी मधोमध उभे आहेत आणि विविध व्यायाम प्रकार करताना दिसत आहेत. एकदा रेलिंगवर चढून, तर एकदा उडी मारून, तर एकदा गोलांटीउडी घेत आजोबा अनोखा व्यायाम करताना दिसले आहेत. तसेच आजोबा या वयात एवढ्या जोशात व्यायाम करत आहेत, हे पाहून काही जण त्यांच्याकडे एकटक बघत आहेत. आजोबा कशा मजेशीर पद्धतीत व्यायाम करत आहेत एकदा तुम्हीसुद्धा बघाच.
हेही वाचा… गुजरातमध्ये रंगला “सायकल गरबा”; अनोख्या गरब्याची सर्वत्र चर्चा, तुम्ही VIDEO पाहिलात का?
व्हिडीओ नक्की बघा :
प्रसिद्ध कलाकाराने केला व्हिडीओ शेअर :
तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल की, रेलिंगवर आजोबा व्यायाम करत असतात, हे पाहून एक अज्ञात व्यक्ती त्यांना सावरायला जाते. पण, आजोबा स्वतःचा तोल जाऊ न देता अगदी व्यवस्थित खाली उतरतात. ‘रामायण’ मालिकेत ‘लक्ष्मण’ यांचं पात्र साकारणाऱ्या कलाकार सुनील लहरी यांनी हा व्हिडीओ पाहताच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे आणि आजोबांची जिद्द आणि जोश पाहून त्यांचे कौतुक केलं आहे. उद्यानात आजोबांचा व्यायाम करतानाचा उत्साह पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sunillahari यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “७० वर्षांपेक्षा अधिक लोकांसाठी वय ही एक फक्त संख्या आहे. प्रत्येक वयात आपण आपल्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा”, अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला
दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी आजोबांच्या ताकदीचे आणि त्यांच्या उत्साहाचे कौतुक करताना दिसत आहेत. तर काही जण आजोबांचा अनोखा व्यायाम पाहून मजेशीर कमेंट करताना दिसून आले आहेत.