Actor Becomes Beggar Earns 8 Lakh Per Month: एखादा नट जेव्हा चेहऱ्यावर रंग चढवतो तेव्हा तो स्वतःला विसरून त्या पात्राचा होऊन जातो असं म्हणतात. त्यापुढे तो जे काही काम करतो ते त्याच्याकडून ते पात्रच घडवून घेत असतं. पात्रासह एकरूप होताना स्वतःला मागे टाकणं हे त्या नटाचं कसब! असाच एका कसलेला अभिनेता आपल्या कलेचा वापर भलत्याच पद्धतीने करून लखपती झाल्याचे समजतेय. म्हणायला त्याची ही कला नक्कीच कौतुकास्पद आहे पण त्याचा मार्ग लोकांना बुचकळ्यात टाकतोय. झालं असं की, चीनमधील एक अभिनेता मागील १२ वर्षांपासून एकाच पर्यटन स्थळी चक्क एका भिकाऱ्याची भूमिका करतो आहे. महिनाभर काम करून तो जमा करत असलेल्या भिकेची रक्कम साधीसुधी नसून चक्क ८ लाख रुपये इतकी आहे, आणि ती सुद्धा एक कवडीचा कर न भरता!
भीक मागण्यासाठी ठिकाणच असं निवडलं की..
लू जिंगांग असे या अभिनेत्याचे नाव आहे. चीनच्या हेनान प्रांतातील किनमिंग शांघे गार्डन या निसर्गरम्य परिसरात तो भिकाऱ्यासारखी रंगभूषा व वेशभूषा करून फिरत असतो. हे ठिकाण सुद्धा अत्यंत खास आहे, याचं कारण म्हणजे हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून इथे श्रीमंत पर्यटकांची वर्दळ असते.
३० दिवसात ८ लाख कमावून देणारं पात्र
लू जिंगांग या परिसरात जेव्हा फिरतो तेव्हा त्याचा चेहरा धुळीने पूर्ण झालेला असतो. केविलवाणे डोळे करून तो पूर्णपणे आपल्या भूमिकेत शिरतो. त्याच्या याच कलेमुळे तो महिन्याला ७० हजार युआन म्हणजेच जवळपास ८ लाखांपेक्षा जास्त रुपये कमावतो. काही जण त्याला येता-जाता खाण्यासाठी सुद्धा देऊन जातात ज्यामुळे तो ही खर्च सहज वाचतो. साधारण आकडेवारी पाहायची झाल्याने चीनमध्ये एखाद्या सामान्य कर्मचाऱ्याचा मासिक पगार सुमारे २९,००० युआन पर्यंत आहे म्हणजे भारतीय चालनानुसार साधारण ३ लाख रुपये. त्या तुलनेत मग हा अभिनेता वजा प्रोफेशनल भिकारी करत असलेली कमाई नक्कीच थक्क करणारी आहे.
हे ही वाचा<< दीड कोटींचा फ्लॅट, महिन्याची कमाई ७५ हजार.. मुंबईत राहणारा जगातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण? फोटो पाहा
अडथळे केले दूर
लू जिंगांग सांगतो की त्याला अभिनयाची आवड होती पण त्यात काम मिळवण्यासाठी शेकडो ऑडिशन द्याव्या लागणार होत्या. हा अडथळा दूर करून त्याने भिकाऱ्यांची भूमिका वठवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कुटुंबाने या निर्णयाचा विरोध केला पण जसेजसे पैसे हाताशी येऊ लागले कुटुंबाने सुद्धा त्याची ही भलतीच करिअरची वाट स्वीकारली.