या आठवड्याच्या सुरुवातीला ट्रू कॉलर, यूसी ब्राऊजर, शेयर-इट, व्ही चॅट यांसारखे अनेक मोबाईल अॅप वापरण्यावर भारतीय सेनेच्या जवानांवर बंदी घालण्यात आली होती. या अॅपचा वापर करून चीनकडून जवानांच्या मोबाईलमधील गोपनीय माहिती चोरण्यात येते, अशी धक्कादायक माहिती समोर आल्यानं सुरक्षायंत्रणेनं हे अॅप्लिकेशन तातडीनं डिलीट करण्याचे आदेश जवानांना दिले. आता हेरगीरी करण्यात येणाऱ्या अॅपच्या यादीत आणखी काही अॅपचा समावेश असल्याचे सुरक्षायंत्रेच्या निदर्शनास आले असून त्यात ४२ मोबाईल अॅप्लिकेशनचा समावेश असल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं म्हटलं आहे.

चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश या अॅप्लिकेशनचा वापर डेटा चोरण्यासाठी करतो अशी माहिती विदेशी सुरक्षायंत्रणेकडून मिळाली. त्यानुसार गृहमंत्रालयानं अॅडव्हायजरी जारी केली असून त्यात ४२ धोकादायक अॅपची नावं दिली आहे. ही अॅप्लिकेशन कोणती हे जाणून घेऊ
– ट्रू कॉलर,
– यूसी ब्राऊजर
– शेयर-इट,
– व्ही चॅट
– व्हिबो
– युसी न्यूज
– ब्युटी प्लस
– ब्युटी क्रॉप
– न्यूज डॉग
– व्हिवा व्हिडिओ QU व्हिडिओ
– पॅरालल स्पेस
– APUS ब्राऊजर
– सीएम ब्राऊजर
– व्हायरस क्लिनर
– यु कॅम मेकअप

-डियु रेकॉर्डर
– डियु क्लिनर
– डियु बॅटरी सेव्हर
– डियु प्रायव्हसी
– ३६० सिक्युरीटी
– एमआय कम्युनिटी
– एमआय स्टोअर
– एमआय व्हिडिओ कॉल
– व्हॉल्ट हाईड
– कॅशे क्लिअर
– क्लिन मास्टर
– वंडर कॅमेरा
– फोटो वंडर
– बैदु ट्रान्सलेट
– बैदु मॅप
– इएस फाइल एक्सप्लोरर

– QQ न्यूज फिड
– QQ प्लेअर
– QQ मेल
– QQ म्यूजिक
-QQ इंटरनॅशनल
– QQ सिक्युरिटी सेंटर
– QQ लाँचर
– वी सिंक
– मेल मास्टर
– सेल्फी सीटी
भारत आणि कॅनडा यांसारख्या देशातून यूसी ब्राऊजरमधून महत्त्वाचा डेटा हॅकर्सकडून चोरी केला जातो अशी तक्रार समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वी गुगलनं यूसी ब्राऊजर प्लेस्टोअरमधून हटवला होता.