Viral video: वैवाहिक जीवन म्हणजे प्रेम, आदर, आणि परस्परांना समजून घेण्याचा सुंदर प्रवास! मात्र, हे नाते कधी कधी वादांमुळे गुंतागुंतीचे होते. नवरा-बायकोच्या नात्यात मतभेद होणे ही सामान्य गोष्ट असली तरी, हे मतभेद योग्य रीतीने सोडवले नाहीत, तर ते नात्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. तर कधी कधी त्याचे गंभीर परिणामही होताना पाहायला मिळतात. अशातच बंगरुळमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे त्यामध्ये बायकोसोबत घरात कडाक्याचं भांडण झालं आणि त्यानंतर नवऱ्याने रागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. एवढंच नाहीतर यामध्ये नवऱ्याचा जागीच मृत्यू झालाय.
व्हायरल होत असलेली ही घटना संबंधित घडलेल्या ठिकाणाच्या इमारतीच्या गॅलरीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते की, एक व्यक्ती पळत पळत येतो आणि इमारतीवरुन थेट खाली उडी मारतो. त्याच वेळी त्या व्यक्तीच्या पाठी एक महिलाही पळत पळत येत असते. पण तिने अडवण्यापूर्वीच तो व्यक्ती उडी मारतो. यावेळी तो ज्याप्रकारे खाली पडला त्याचंही सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे, यामध्येही प्रचंड वेगात खाली आला आणि आदळल्याचं दिसत आहे. तसेच व्हिडिओत तुम्हाला त्या महिलेच्या किंचाळण्याचा आवाज आणि परिसरातील नागरिकांची जमलेली गर्दी दिसून येईल.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Deadlykalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “सर्वच नवरा बायकोमध्ये वाद होत असतात, पण त्यावर हे अशाप्रकारे आयुष्य संपवनं उपाय नाहीये.” तर आणखी एकानं, “आहे तोपर्यंत किंमत करा एकदा गेलेला माणूस पुन्हा येत नाही”
नवरा-बायकोतील भांडणं तशी काही नवी नाहीत. बहुतेक पती-पत्नीत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होतातच. अगदी क्षुल्लक कारणावरूनही जोडपी भांडत असतात. लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस संपले की, नवरा-बायकोमध्ये वाद व्हायला सुरुवात होते. मात्र ही भांडणं नवरा बायकोनंच समजुतीनं संपवायची असतात. मात्र कधी कधी दोघांचाही इगो मध्ये येतो आणि ते नातं आणखी बिघडतं आणि आता पाहिलेल्या प्रकरणाप्रमाणे त्याचे परिणाम पाहायला मिळतात. त्यामुळे वेळीच याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.