जेव्हा लोक रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा ते अनेकदा आपल्या पार्टनरच्या वैयक्तिक गोष्टींवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतात. रिलेशनशिपमध्ये असणारे लोक अनेकदा एकमेकांचे फोन तपासतात किंवा पार्टनरने लिहिलेली पर्सनल डायरी वाचतात. असं करण्याचं कारण म्हणजे आपला पार्टनर आपल्यापासून काही लपवतो का? शिवाय तो आपल्याबद्दल काय विचार करतो, किंवा त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे, हे जाणून घेण्याची इच्छा रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असते. शिवाय अशा गोष्टी जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. मात्र, सध्या एका तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडची पर्सनल डायरी वाचल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला आहे. शिवाय आपली गर्लफ्रेंडची अशी असेल, असा स्वप्नातही विचार केला नव्हता, असं देखील तो म्हणत आहे.

गर्लफ्रेंडची पर्सनल डायरी वाचल्यानंतर बसला धक्का –

गर्लफ्रेंडची पर्सनल डायरी वाचलेल्या तरुणाने त्याच्यासोबत घडलेला किस्सा Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तरुणाने सांगितले, “माझी गर्लफ्रेंड आणि आम्ही दोघेही जवळपास एक वर्षापासून लॉन्ग डिस्टंस रिलेशनशिपमध्ये आहोत. मी तिला एक दोन आठवड्यांनंतर भेटतो. मागच्या वेळी मी तिला भेटायला गेलो होतो, तेव्हा मी काही कामानिमित्त तिला एक वही मागितली. यावेळी तिने एका कपाटातील डायरी घ्यायला सांगितली, मी कपाटाजवळ गेल्यावर मला तिथे आणखी एक डायरी दिसली, ती डायरी उघडून वाचण्याचा मोह मला आवरता आला नाही, त्यामुळे मी डायरी उघडली आणि वाचू लागलो. पण डायरीमध्ये लिहिलेला मजकूर वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली.”

हेही वाचा- “भावा तिथे गेलाच कशाला…?” स्टेडियममध्ये जाऊन मोबाईवर मॅच पाहणाऱ्या तरुणाचा Video व्हायरल, नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियासह प्रत्येक गोष्टीवर ठेवते लक्ष –

तरुणाने सांगितलं, आमचं नातं चांगलं चाललं होतं, पण जेव्हापासून आम्ही लॉन्ग डिस्टेंसमध्ये राहायला लागलो, तेंव्हापासून ती माझ्यावर संशय घेते. मी काही कामानिमित्त बाहेर जातो, तेव्हा तिला मी तिची फसवणूक करत असल्याचं वाटतं. शिवाय मी बाहेर मुलीसोबत फिरतो असा संशय ती घेते. धक्कादायक बाब म्हणजे तिने डायरीमध्ये दुसऱ्या एका मुलीसाठी शिव्यादेखील लिहिल्या आहेत. तो म्हणाला इतकच नाही तर माझी गर्लफ्रेंड माझे सर्व सोशल अकाउंट ट्रॅक करते. मला कोणाच्या पोस्ट जास्त आवडतात किंवा मी कोणाशी चॅट करतो हे ती तपासते.

दोघांचे नातं संपणार?

हेही वाचा- आनंद महिंद्रांनी शब्द पाळला; सिहिंणीच्या फोटोला सर्वोत्तम कॅप्शन देणाऱ्या व्यक्तीला गिफ्टमध्ये दिला ‘ट्रक’, ट्वीट Viral

तरुणाने पुढे सांगितले की, ती माझ्याबद्दल असा विचार करते ते समजल्यावर मला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मी कुठे आणि कोणाबरोबर जातो हे सगळं सांगतो तरीही ती माझ्यावर खूप शंका घेते. मला माहीत आहे की मी तिला फसवत नाही, पण तिची डायरी वाचून मी उदास झालो आहे. शिवाय आता आमच्या नात्याचं काय करावं हे कळत नाहीये. शिवाय आता आमचं नातं संपवावं की तसंच सुरु ठेवावं? हा विचार करुन करुन माझं डोक फिरत आहे.

तरुणाला नेटकऱ्यांनी दिला सल्ला –

या मुलाने गर्लफ्रेंडबद्दलच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करताच नेटकऱ्यांनी त्याला सल्ला द्यायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिलं आहे की, लवकरात लवकर या मुलीपासून दूर हो, नाहीतर तू खूप वाईटरित्या फसशील. तर दुसऱ्या एकाने, “मुलगी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ दिसत आहे, एक दिवस ती तुझ्यासाठी मोठी समस्या ठरु शकते, तिच्यापासून लांब हो.”