scorecardresearch

फोटो न मिळाल्याने चाहत्याने बळजबरीने धरले अक्षय कुमारचे डोकं; Video Viral

काहीवेळा चाहते सेल्फी घेण्यासाठी मर्यादा ओलांडताना दिसतात.

akshay-kumar-7593
(Express photo by Jasbir Malhi)

आपल्या आवडत्या कलाकारांची झलक पाहण्यासाठी चाहते काय करतील हे सांगता येत नाही. ते त्यांना दूरवर फॉलो करतात आणि काहीही करून त्याच्यासोबत एक फोटो काढू इच्छितात. अक्षय कुमारचे चाहते जगभर आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमारचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्यांना या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाही. होय, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही की काहीवेळा चाहते सेल्फी घेण्यासाठी मर्यादा ओलांडतात आणि हे विसरतात की सेलेब्स देखील आपल्यासारखेच माणूस आहेत.

व्हिडीओ व्हायरल

अक्षय कुमारचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांनी घेरलेला दिसत आहे. सोबत अभिनेत्याचे बॉडीगार्डही पाहायला मिळतात. अक्षयच्या चाहत्यांना त्याला पाहून खूप आनंद झाला आणि त्यांना त्याच्यासोबत हस्तांदोलन आणि सेल्फी घ्यायचे आहेत हे त्या व्हिडीओमध्ये दिसून येत. अक्षय त्याच्या चाहत्यांना खूप आनंदात भेटतोय, तेव्हाच काहीतरी घडलं की अभिनेता रागावतो.वास्तविक, जेव्हा अक्षय त्याच्या प्रियजनांना भेटण्यासाठी गर्दीतून बाहेर पडतो, तेव्हाच एका चाहत्याने त्याचे डोके पकडून त्याला मागे वळवतो. अभिनेत्याचे डोके धरून तो कॅमेरा त्याच्या तोंडाजवळ घेतो आणि फोटो क्लिक करू लागतो. चाहत्याच्या या कृतीचा अक्षय कुमारला राग आला आणि तो त्याला हात धरून काहीतरी बोलतांनाही दिसत आहे.

(हे ही वाचा: समुद्रकिनाऱ्यावर धावणारे ‘बेबी डायनासोर’? viral video बघून नेटीझन्स झाले आश्चर्यचकित)

(हे ही वाचा: अजब प्रेम कहाणी! विद्यार्थिनी चक्क शिक्षकालाच घेऊन पळाली; म्हणाली, “आता जगणं…”)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत, ज्यावर लोक मजेशीर प्रतिक्रियाही देत ​​आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ” विमलच्या जाहीराती नंतर चाहते “, तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, “एक दूरचा नातेवाईक दिसतो”.तर तिथे दुसरा लिहितो, “आणि अशा प्रकारे आम्ही QR कोड स्कॅन करतो”. अशा अनेक मजेशीर प्रतिक्रिया या व्हिसीओवर पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar angry on a fan who was trying to click selfie by holding his head viral video ttg

ताज्या बातम्या