Akshaya Tritiya 2024 Wishes: साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच,अक्षय्य तृतीया. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेला दान धर्म करण्याचीही प्रथा आहे. आखाजी… अश्या कितीतरी नावांनी साजरा होणारा हा सण भारतातल्या अनेक भागात निरनिराळ्या नावाने साजरा होतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, अक्षय्य तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते. यावेळी अक्षय्य तृतीया हा सण शुक्रवार, १० मे २०२४ रोजी साजरा होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी केल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. या दिवशी अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी नारायण आणि कलशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.

अक्षय्य तृतीयेला विशेषतः देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. त्यांच्या आशीर्वादाने सुख-समृद्धीने आपल्या घराची भरभराट होते, असे मानले जाते. या दिवशी सर्वजण त्यांच्या जीवनात समृद्धी येवो, अशी प्रार्थना करतात. तुम्हालाही तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना यंदाच्या अक्षय्य तृतीयेला शुभेच्छा द्यायच्या असतील तर, आज आम्ही तुमच्यासाठी मराठमोळे शुभेच्छा संदेश घेऊन आले आहोत. या शुभ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा देऊन अक्षय्य तृतीयेचा आनंद द्विगुणीत करा…पाहा खास शुभेच्छा…

अक्षय्य तृतीयेला द्या ‘या’ खास शुभेच्छा!

घन न घन जसा बरसतो ढग,
धो धो जसा कोसळतो पाऊस
चारही दिशेत संचारते ऊर्जा
तशीच होवो आपल्या दारी धनाची वर्षा,
मंगलमय होवो हा पावन सण
आपणास अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

माता लक्ष्मीचा हात असो,
सरस्वतीची साथ असो,
गणपती बाप्पाचा वास असो,
तसाच आई-वडिलांचा आशीर्वाद असो,
त्यांच्याच पुण्याईने जीवन जाई उजळूनी,
येई सुख समृद्धी लाभ जीवनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी…
शुभेच्छा आपणास अक्षय्य तृतीयेच्या पावन दिनी…!

अक्षय राहो सुख तुमचे…
अक्षय राहो धन तुमचे…
अक्षय राहो प्रेम तुमचे…
अक्षय राहो आरोग्य तुमचे…
असो तुमची किर्ती अपरंपार..
हो तुमची सदा जयजयकार…
हो तुमची सदा जयजयकार…
अक्षय्य तृतीया दिनाच्या आपणास मंगलमय शुभेच्छा..!

नुसतीच नाही सोने-चांदी खरेदी
दानाचं ही आहे महत्त्व या दिवशी
हा सण आहे भरभराटीचा…
हा सण आहे दानधर्माचा..
हा सण आहे सर्वांसाठी खासम खास
सर्वांना मिळो मनाचे बळ…
सर्वांना मिळो अक्षय फळ…
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

सोनेरी दिवशी दारी लक्ष्मी आली
जीवनदीप जाई उजळुनी,
सुख, समृद्धी लाभो जीवनी,
भक्ती-प्रेमरस ओथंबुनी,
बंधुभाव वाढे या जीवनी
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा या पावन दिनी..!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशाप्रकारे तुम्ही आपल्या प्रिजयनांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता.